Jalna Crime : माहेरहून १ लाख रुपये आण; विवाहितेचा छळ

घनसावंगीत सासू-सासऱ्यांवर गुन्हा दाखल
dowry harassment allegation
dowry harassment allegationpudhari photo
Published on
Updated on

जालना : लग्न झाल्यानंतर काही महिने चांगले वागवून नंतर 'माहेरहून महालक्ष्मीचे मकर दिले नाही' आणि 'सलूनचे दुकान टाकण्यासाठी एक लाख रुपये आणून दे' अशी मागणी करत २४ वर्षीय विवाहितेचा अमानुष शारीरिक व मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेच्या तक्रारीवरून घनसावंगी पोलिसांत सासू व सासऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गायत्री ज्ञानेश्वर बर्वे (वय २४, मूळ रा. आष्टी, ता. परतूर) यांचा विवाह जून २०२५ मध्ये पार पडला होता. लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने सासरच्यांनी त्यांना चांगली वागणूक दिली. मात्र, त्यानंतर सासरा ज्ञानेश्वर गिताराम बर्वे व सासू सुमन गिताराम बर्वे (दोघे रा. आष्टी) यांनी क्षुल्लक कारणावरून त्रास देण्यास सुरुवात केली.

dowry harassment allegation
Jalna Crime : ९९ हजारांची शिक्षकाची ऑनलाइन फसवणूक; खात्यातून वळती

गायत्री यांच्या चारित्र्यावर संशय घेत त्यांना फोनवर बोलण्यास मज्जाव केला आणि नित्य नियमाने शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच दुकान टाकण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणण्याचा तगादा लावला. या त्रासाला कंटाळून गायत्री यांनी भावाला सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर भावाने त्यांना घनसावंगी येथे आणले. अखेर पीडितेच्या तक्रारीवरून घनसावंगी पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोह. गोलडे पुढील तपास करत आहेत.

dowry harassment allegation
Chhatrapati Sambhajinagar theft : एकाच रात्री चार बंद घरे फोडली; सिडको वाळूज महानगरातील घटना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news