Jalna malnutrition campaign : अडीचशे प्रशिक्षणार्थी पेटवणार जिल्ह्यात कुपोषणमुक्तीचा दिवा

‌‘कुपोषणमुक्त जालना‌’साठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत ः जिल्हाधिकारी
Jalna malnutrition campaign
जालना ः मिशन न्युट्रीशन जालना अंतर्गत आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकार आशिमा मित्तल यांच्या हस्ते बालकाचा गुलाबाचे फुल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित अधिकारी.pudhari photo
Published on
Updated on

जालना ः जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करून बालकांचे आरोग्य सुदृढ करण्याच्या उद्देशाने आरोग्य विभाग व महिला व बाल विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने प्रयत्न केल्या जात आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून जिल्हाभरातील प्रशिक्षित करण्यात आलेले 250 जण 2 हजार 250 माताबालकांपर्यंत पोहचणार आहे. त्यांना कुपोषणासंदर्भात मार्गदर्शन करणार आहे.

दरम्यान, मिशन न्युट्रीशन जालना अंतर्गत जिल्हा स्त्री रुग्णालय, जालना येथे दि. 25 मे ते 7 जून या कालावधीत आयोजित जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन दि. 25 मे रोजी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते पार पडले.

Jalna malnutrition campaign
Jalgaon News : जळगाव जिल्हा “आरोग्य संपन्न” बनविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे : पालकमंत्री गुलाबराव पाटील

यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी “कुपोषणमुक्त जालना” हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आरोग्य विभाग, महिला व बाल विकास विभाग तसेच सर्व संबंधित कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले. जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करून बालकांचे आरोग्य सुदृढ करण्याच्या उद्देशाने आरोग्य विभाग व महिला व बाल विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

प्रशिक्षणासाठी आयआयटी मुंबई यांच्या माध्यमातून पोषण आहारासंदर्भातील शैक्षणिक व्हिडिओचा उपयोग करण्यात येत असून व्हील ग्लोबल फाऊंडेशन यांच्या सहकार्याने प्रशिक्षण प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत सुमारे 250 प्रशिक्षणार्थींना विशेष प्रशिक्षण दिले जाणार असून प्रशिक्षणानंतर प्रत्येक प्रशिक्षणार्थीने 1:3 या प्रमाणात मातां व बालकांना दत्तक घेऊन त्यांचे समुपदेशन करायचे आहे. यामध्ये पोषण आहाराचे महत्त्व, संतुलित आहार, बालकांच्या वाढीचे निरीक्षण आणि कुपोषण टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती दिली जाणार आहे. तीन महिन्यांच्या कालावधीत सुमारे 2 हजार 250 माता व बालकांपर्यंत या मोहिमेचा लाभ पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Jalna malnutrition campaign
Tribal Development Corruption: आदिवासी विकास विभागाचा निधी संशयाच्या भोवऱ्यात; चौकशीची मागणी

सदर प्रशिक्षण कार्यक्रम जिल्ह्यातील कुपोषण निर्मूलनासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमास जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्णकांत कनवारिया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील, डीएचओ डॉ. जयश्री भुसारे, डॉ. प्राची तापशेटीवार, डॉ. जी. डी. म्हस्के, महिला व बाल विकास विभागाच्या श्रीमती कोरे, जिल्हा प्रकल्प समन्वयक संदीप गुसाळे, साक्षी उगले, आरोग्य विभाग व एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हे आहेत प्रशिक्षणार्थी

या प्रशिक्षणामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी, गटप्रवर्तक, आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी सेविका यांना पोषण आहार, संतुलित आहार, माता व बालकांच्या आरोग्याची काळजी तसेच कुपोषण प्रतिबंध याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news