

परतूर : परतूर तालुक्यातील सालगाव येथे सांयकाळी पाच वाजल्याच्या दरम्यान विज पडून एक जण मृत्यु पावला तर एकाला हात गमवावा लागला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दुपारी चार ते पाच वाजेच्या दरम्यान मोठया प्रमाणात विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली होती. या पावसापासुन संरक्षण घेण्यासाठी आपल्या शेतातील झाडाखाली असलेल्या खोपीत तिघांनी आसरा घेतला. परंतू विज कडकडाट करीत त्या झोपडीवर येऊन पडली.
या झोपडीत आसरा घेणारे वडील विलास गाढवे मुलगा सुनिल गाढवे व त्यांचा कामावरील मजूर सखाराम श्रीरंग राऊत हे तिघे जन झोपडील बसलेले होते. त्यात सुनिल विलास गाढवे वय २८ वर्ष याचे सेलू येथे रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले असल्याची माहिती माजी सरपंच ओमप्रकाश साठे यांनी दिली. विलासचे लग्न हे गेल्या वर्षीच झाले असुन एक अपत्य असल्याचे व त्याचा मजूर सखाराम श्रीरंग जईद यांना आपला हात गमवावा लागला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यामध्ये विलास गाढवे हे सुखरूप असल्याचेही कळते. या घटनेमुळे सालगाव मध्ये हळहळ व्यक्त होत आहे.