Jalna Crime : चोरीच्या दोन दुचाकींसह आरोपी जेरबंद

2 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
Jalna Crime
जालना ः येथील स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी दुचाकी चोरास जेरबंद केले.pudhari photo
Published on
Updated on

जालना ः येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका आरोपीला अटक करून त्याच्या ताब्यातून दोन चोरीच्या दुचाकी जप्त केल्या. या कारवाईत 2 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बदनापूर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना एलसीबीला खबऱ्याने माहिती दिली. त्यानुसार चंदनझिरा परिसरात सापळा रचून पोलिसांनी मुस्तफा अब्दुल सत्तार सय्यद (रा. चंदनझिरा, जालना) याला ताब्यात घेतले.

Jalna Crime
Jalna illegal sand mining : अवैध वाळूसह 20 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त

चौकशीदरम्यान आरोपीने दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून बजाज पल्सर 150 व रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 अशा दोन चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. जप्त वाहनांची अंदाजे किंमत अनुक्रमे 75 हजार व 1.50 लाख रुपये असून पोलिसांनी सव्वादोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Jalna Crime
Ahilyanagar Solar Cable Theft: अहिल्यानगरमध्ये सोलर केबल चोरीचा पर्दाफाश; चौघांना अटक, 9.91 लाखांचा मुद्देमाल जप्त

ही कारवाई पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news