Kirtankar Maharaj death| भजन सुरु असतानाच किर्तनकार महाराजांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यातील सुरम गाव येथील घटना
Kirtankar Maharaj death| भजन सुरु असतानाच किर्तनकार महाराजांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन
Published on
Updated on

परतूर : तालुक्यात सुरूमगाव तांड्यावर भजन सुरु असतानाच एका किर्तनकार महाराजांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रामधन महाराज राठोड (वय : 60 वर्ष, रा.काकडा रामेश्वर तांडा, ता.जालना, जि. जालना) असं या महाराजांचं नाव आहे. तेराव्याचे भजन सुरु असतानाच महाराज अचानक कोसळले, यातच त्याचं निधन झाले आहे.

Kirtankar Maharaj death| भजन सुरु असतानाच किर्तनकार महाराजांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन
Satara Accident: चौघांच्या मृत्यूने परळी खोरे हेलावले

परतूर तालुक्यातील सुरूमगाव तांडा येथे बंजारा समाजाचे प्रसिद्ध प्रबोधनकार रामधन महाराज राठोड यांचे भजन सुरु होते. यावेळीच त्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. प्रवचन आणि भजन कार्यक्रमा दरम्यान त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि ते जागीच कोसळले.

Kirtankar Maharaj death| भजन सुरु असतानाच किर्तनकार महाराजांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन
Satara Accident: चौघांच्या मृत्यूने परळी खोरे हेलावले

किर्तन ऐकण्यासाठी उपस्थितांनी त्यांना तातडीने दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. आपल्या प्रबोधन आणि कीर्तनातून पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या रामधन महाराजांच्या निधनाने शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news