Jalna Crime : वॉशरूमला जाते सांगून बाहेर पडलेली अल्पवयीन मुलगी बेपत्ता

कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद, शोधाशोध सुरू
Jalna minor girl missing case
Jalna minor girl missing casepudhari photo
Published on
Updated on

जालना : शहरातील कदीम जालना परिसरातून 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित मुलगी ‌‘वॉशरूमला जाते‌’ असे सांगून घराबाहेर पडली; मात्र त्यानंतर ती परत न आल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला. अखेर अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत कदीम जालना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राजेंद्र श्रीकृष्ण पाठक (वय 50, व्यवसाय शेती, रा. कसबा गांधीचमन, जुना जालना) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची 17 वर्षीय मुलगी सोमवार, दि. 6 रोजी दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडली. मी वॉशरूमला जाते असे सांगून ती घरातून निघून गेली; मात्र बराच वेळ उलटल्यानंतरही ती परत आली नाही. यामुळे तिच्या कुटुंबीयांची चिंता वाढली.

Jalna minor girl missing case
Beed crime news | माता न तू वैरिणी: 'बाथरूमला जाते' सांगून पोटच्या दीड वर्षांच्या चिमुकलीला आईनेच सोडले बेवारस

दरम्यान, पाठक कुटुंबीयांनी जालना शहरातील बसस्थानक, रेल्वे स्टेशन तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला. तिच्या मैत्रिणींशीही संपर्क साधून माहिती घेतली; मात्र कुठेही ठावठिकाणा लागला नाही. यामुळे अज्ञात इसमाने ुफूस लावून तिला पळवून नेले असावे, असा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.

हरवलेल्या अक्षराचे वर्णन असे की, तिने काळ्या रंगाचा टॉप व निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट परिधान केली होती. पायात चप्पल असून केस लांब आहेत. या घटनेची नोंद कदीम जालना पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

Jalna minor girl missing case
Bengaluru News: AI मुळे नोकरी गेल्याने इंजिनिअरने जीवन संपवले; पतीचा मृतदेह पाहून पत्नीनेही १८ व्या मजल्यावरून उडी मारली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news