Dhangar Reservation Protest | जामखेड येथे धनगर समाजाचे भरपावसात पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन, आंदोलकाला समजावताना एकाला चक्कर

Jalna News | एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची मागणी
Jamkhed Dhangar Reservation Protest
जामखेड येथील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करताना धनगर समाज (Pudhari Photo)
Published on
Updated on

Jamkhed Dhangar Reservation Protest

जामखेड: जालना येथे दीपक बोराडे यांचे एस.टी आरक्षण अंमलबजावणीसाठी उपोषणास सुरू असतानाच आज (दि.२७) जामखेड येथील धनगर समाज बांधव धनगर एस.टी आरक्षण अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी जामखेड येथील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत आहेत. यावेळी आंदोलक भगवान भोजने यांना त्यांचे बंधू संभाजी भोजने समजावत असताना ते स्वतः चक्कर येऊन पडले त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

दीपक बोराडे यांचे धनगर एस.टी आरक्षण अंमलबजावणीसाठी उपोषण सुरू असतानाच जामखेड (ता. अंबड) येथील भगवान भोजने, देवलाल मंडलिक, भगवान आबा भोजने हे तीन धनगर बांधव दहा वाजेपासून पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करत आहे. धनगर एस.टी आरक्षण अंमलबजावणी नाही झाली तर या आंदोलकांनी आत्महत्या करण्याचा इशारा देखील दिला आहे.

Jamkhed Dhangar Reservation Protest
Jalna Rain : जालना जिल्ह्यात परतीच्या पावसाचा हाहाकार, कुंडलिका, सीना नदीला महापूर

यावेळी समाज बांधवांच्या वतीने यळकोट येळकोट 'जय मल्हार , धनगर एस.टी आरक्षण अंबलबजावणी झालीच पाहिजे , धनगर एकजुटीचा' विजय असो, अशा घोषणा देत आहेत. जामखेड येथील शेकडो धनगर समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहे. आंदोलन पाण्याच्या टाकी वरती भर पावसात सुरू असून अद्याप कोणताही प्रशासकीय अधिकारी त्या ठिकाणी दाखल झालेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news