Jalna crime : सराईत गुन्हेगारावर प्रतिबंधक कारवाई

हर्सूल कारागृहात रवानगी; कदीम जालना पोलिसांची कारवाई
Jalna crime
जालना : येथील कदीम जालना पोलिसांनी सराईत गुन्हेगार शेख इम्रान शेख सलीम याला जेरबंद करून त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई केली.pudhari photo
Published on
Updated on

जालना : जालना शहरातील इंदिरा नगर भागात राहणारा सराईत गुन्हेगार शेख इम्रान शेख सलीम (लुकडा) यास कदीम जालना पोलीसांनी जेरबंद करुन त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई केली आहे.

जालना शहरातील सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी दिले होते. या पार्श्वभुमीवर कदीम जालना पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार इम्रान शेख सलीम (लुकडा) ऊर्फ सय्यद इम्रान सय्यद सलीम याच्यावर कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्धन शेवाळे यांनी प्रस्ताव तयार करुन तो उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या मार्फत जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधीकारी जालना यांना पाठविला होता.

सदर प्रस्तावाचे अवलोकन करुन जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधीकारी यांनी 27 जानेवारी रोजी सदर गुन्हेगारास 01 वर्षाकरीता मध्यवर्ती कारागृह हर्सल छत्रपती संभाजीनगर येथे स्थानबध्द करण्याचे आदेश पारीत केले होते. तेव्हा पासुन सदर स्थानबध्द इसम फरार असल्यांने सदर गुन्हेगाराचा पोलीस शोध सुरु होता.

Jalna crime
Partur traders long march : शहरात निघाला व्यापाऱ्यांचा लाँग मार्च

2 फेब्रुवारी रोजी सदरचा गुन्हेगार हा इंदीरानगर येथे येथे मित्राला भेटण्यासाठी येणार असल्याची माहीती पोलीस निरीक्षक जनार्धन शेवाळे यांना मिळाल्यांने त्यांनी मुक्तेश्वरव्दर व इंदीरानगर परीसरात सापळा रचुन स्थानबध्द इसम इम्रान शेख सलीम (लुकडा) ऊर्फ सय्यद इम्रान सय्यद सलीम यास ताब्यात घेउन एमपीडीए कायदयाप्रमाणे छत्रपती संभाजीनगर येथील हर्सुल येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्याची कारवाई सुरु केली आहे.

Jalna crime
Paithan illegal liquor : पैठण तालुक्यात अवैध दारूचा महापूर

यांनी केली कारवाई...

सदरची कारवाई पोलिस अधिक्षक अजय कुमार बसंल , अप्पर पोलिस अधिक्षक आयुष नोपानी ,उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जनार्धन शेवाळे, सपोनि आरती जाधव, पोलीस उपनिरीक्षक दिनकर मोरे, जमादार सदा राठोड, पोलिस कर्मचारी बाबा गायकवाड, संदीप चव्हाण, कृष्णा चव्हाण, विलास राऊत, मतीन शेख, बलराम जारवाल, सदाशीव मुटकुळे व अमजद पठाण यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news