

Jalna Heavy Rain due to agriculture loss
तळणी, पुढारी वृत्तसेवा : मंठा तालुक्यातील तळणी कृषी मंडळात रविवारी (ता.२२) मध्यरात्री कोसळलेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. चोवीस तासात १४७मीमी पडलेल्या पावसामुळे मंडळात पाणीबाणीची परिस्थीती निर्माण झाली आहे.
मंडळात महसूल, कृषी व पंचायत समितीच्या संयुक्त अहवालानुसार तब्बल २० हजार ९१० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. सरकारच्या ढिसाळ कारभाराविरोधात शेतकऱ्यांत प्रचंड संताप व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण मदत मिळावी म्हणून जिल्हाधीकारी यांच्या दालनात परिसरातील शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर प्रशासन कोणती कार्यवाही करते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. तळणी परीसर हा विदर्भ व मराठवाड्याच्या सिमेवर असल्याने रेड अलर्ट घोषित झाला की तळणीत पाऊस पडतो.