Jalna floating garden project : स्थायी समितीच्या बैठकीत फ्लोटिंग गार्डनला मंजुरी

पाणीपुरवठा योजना दुरुस्तीसाठी फेरनिविदेचा निर्णय
Jalna floating garden
स्थायी समितीच्या बैठकीत फ्लोटिंग गार्डनला मंजुरीpudhari photo
Published on
Updated on

जालना : जालना शहर महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा सोमवारी (दि. 12) सकाळी 11 वाजता मनपाच्या प्रशासकीय इमारतीतील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात पार पडली. स्थायी समिती सभापती अशोक ऊर्फ लक्ष्मीकांत मनोहर पांगारकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस समिती सदस्यांसह मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री गिराम, उपआयुक्त केशन कानपुडे, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीत विविध विषयपत्रिकांवरील मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील फ्लोटिंग गार्डनच्या कामाच्या दरपत्रकास मंजुरी देण्यात आली. तसेच जायकवाडी-जालना पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल व दुरुस्ती कामांसाठी फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

Jalna floating garden
Sambhajinagar News : अवघ्या १५ मिनिटांत ३.५० कोटींचे प्रस्ताव मंजूर

यावेळी पाणीपुरवठा, स्वच्छता, वीज, कर्मचारी भरती, सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे तसेच शिक्षण विभागाशी संबंधित विषयांवरही चर्चा झाली. नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित कामांना प्राधान्य देऊन ती तातडीने पूर्ण करावीत, अशा सूचना सभापती व सदस्यांनी प्रशासनाला दिल्या.

Jalna floating garden
"कोणती निवडणूक लढवायची आहे? वाईटपणा घ्या पण..."; पालकमंत्र्यांनी मुख्याधिकाऱ्यांना झापले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news