Sambhajinagar News : अवघ्या १५ मिनिटांत ३.५० कोटींचे प्रस्ताव मंजूर

स्थायी समिती : कोविडच्या बिलासह ३१ कामांचा समावेश
Money
MoneyPudhari
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी (दि.५) अवघ्या १५ मिनिटांत सुमारे साडेतीन कोटी रुपयांच्या ३१ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. सभापती अनिल मकरिये यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी मोठ्या खर्चाच्या प्रस्तावांना झटपट हिरवा कंदील देण्यात आला. यात मनपा शालेय विद्यार्थ्यांना विविध खेळांसाठी ४० लाखांच्या साहित्याची खरेदी, वाहतूक सिग्नलसाठी ३६ लाख, शहरातील १४ कारंज्यांसाठी १ कोटी ५१ लाख, सिद्धार्थ उद्यानातील प्राण्यांचे पिंजरे दुरुस्तीसाठी ४९ लाख रुपयांसह विविध खर्चाना मान्यता देण्यात आली आहे.

स्थायी समितीच्या १३ एप्रिल रोजी पार पडलेल्या बैठकीच्या इतिवृत्तास मंजुरी देण्यासोबतच विविध विकासकामांशी संबंधित प्रस्तावांना मान्यता देण्यासाठी सभापती अनिल मकरिये यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

Money
Pimpri Chinchwad Bicycle Sharing Project: पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा सायकल शेअरिंग; स्थायी समितीकडून विकासकामांना मंजुरी

यात महापालिकेच्या ५० शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी १०२ प्रकारच्या कीडासाहित्य खरेदीस मान्यता देण्यात आली. तसेच प्रभाग क्रमांक १६ मधील भीमनगर भावसिंगपुरा परिसरातील सावित्रीबाई फुले चौक येथे नाल्यावर नवीन पूल उभारण्यासाठी २९ लाख ३३ हजार ७९३ रुपयांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

यासह कोरोनाकाळात जुलै ते सप्टेंबर २०२१ दरम्यान कोविड-१९ लसीकरण केंद्रांसाठी मंडप, खुर्चा व इतर साहित्य भाड्याने घेण्यात आले होते. त्यासाठी गजानन विधाटे यांना देय असलेले २९ लाख १६ हजार ६०८ रुपयांचे बिलही मंजूर करण्यात आले.

Money
Hinjawadi Traffic Solution: हिंजवडीतील वाहतूककोंडीवर PMRDAचा उपाय; सहा नवीन जोडरस्ते होणार

याशिवाय, सिडको बसस्थानक ते चिकलठाणा मार्गावरील अतिक्रमण हटवून उभारण्यात आलेल्या कमानीसाठी ३३ लाख ७५ हजार ८४६ रुपये, तर प्रभाग १०७ मधील पैठण रोड ते हनुमान मंदिर दरम्यान सिमेंट काँक्रीट रस्त्यासाठी ४७लाख ४२ हजार ९०६ रुपयांच्या कामास मान्यता देण्यात आली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, कल्पिता पिंपळे, उपायुक्त तथा नगरसचिव नंदकिशोर भोंबे यांच्यासह स्थायी समितीचे सदस्य उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news