Jalna white musli cultivation : जिल्ह्यातील १४० शेतकऱ्यांनी केली सफेद मुसळीची लागवड

नावीन्यपूर्ण शेतीकडे शेतकऱ्यांचा कल; सफेद मुसळी लागवडीमुळे नवी आर्थिक संधी
Jalna white musli cultivation
जालना : सफेद मुसळीची लागवड करताना शेतकरी. काही ठिकाणी अशा पध्दतीने सफेद मुसळी उगवून आली आहे. pudhari photo
Published on
Updated on

जालना : प्रामुख्याने जिरायती पिकांवर अवलंबून असलेल्या जालना जिल्ह्यातील शेतकरी आता शेती पद्धतीत बदल करत नावीन्यपूर्ण पिकांकडे वळताना दिसत आहेत. पारंपरिक पिकांसोबतच मोसंबीच्या उत्पादनातून अतिरिक्त उत्पन्न मिळवणारे शेतकरी आता कंदवर्गीय रानभाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सफेद मुसळीच्या लागवडीकडे वळले आहेत. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा जालनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुमारे १४० शेतकऱ्यांनी या पिकाची लागवड करून नव्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

आत्मा नियामक मंडळाच्या अध्यक्षा तथा जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल आणि आत्माचे प्रकल्प संचालक अमोल आगवण यांच्या मार्गदर्शनाखाली या पिकाचे प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आधुनिक आणि बाजारपेठाभिमुख शेती पद्धतीची माहिती मिळत असून, पीक पद्धतीत सकारात्मक बदल होत आहेत.

Jalna white musli cultivation
Latur news | चाकूर तालुक्यात राजमा पिकाचे क्षेत्र वाढले: शेतकऱ्यांची हरभऱ्याऐवजी राजमा पिकाला अधिक पसंती

सफेद मुसळी हे औषधी गुणधर्मांनी समृद्ध आणि बाजारात चांगली मागणी असलेले पीक आहे. त्यामुळे या पिकाच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांना पारंपरिक पिकांच्या तुलनेत अधिक आर्थिक नफा मिळण्याची शक्यता आहे. कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न देणारे हे पीक असल्याने पाण्याचा तुलनेने कमी वापर होतो, तसेच उत्पादन खर्च नियंत्रित राहतो.

याशिवाय, या उपक्रमामुळे पुढील वर्षासाठी लागवडीसाठी आवश्यक बियाणे जिल्ह्यातच उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बाहेरील बाजारावर अवलंबून राहावे लागणार नाही आणि उत्पादन खर्चात बचत होईल. स्थानिक पातळीवर बियाणे उपलब्ध झाल्यामुळे लागवड क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. सफेद मुसळीच्या लागवडीमुळे शेतीत विविधता येत असून, जोखीम कमी करण्यास मदत होत आहे.

Jalna white musli cultivation
Jalna agriculture news : 'महाबीज'च्या मोफत बियाणांचा फज्जा?

हवामानातील बदलांचा परिणाम कमी करण्यासाठीही हे पीक उपयुक्त ठरत आहे. तसेच औषधी वनस्पतींच्या वाढत्या मागणीमुळे शेतकऱ्यांना स्थिर आणि चांगला बाजारभाव मिळण्याची शक्यता आहे. एकूणच, जालना जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीतून बाहेर पडून नावीन्यपूर्ण पिकांकडे वळत असल्याचे चित्र दिसत आहे.

आत्माच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेला हा उपक्रम शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी आणि शेतीच्या शाश्वत विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जिल्ह्यात हळूहळू सफेद मुसळीची लागवड होत आहे. शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल.

अमोल आगवण, प्रकल्प संचालक आत्मा जालना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news