Jalna state excise revenue : परवाना नूतनीकरणातून तिजोरी तुडुंब; महसुलात ३० टक्‍के वाढ

राज्य उत्पादन शुल्क विभागाची वसुलीत भरारी; एप्रिल-मे २०२५ मध्ये १३२ टक्क्यांची भर
Money
MoneyPudhari
Published on: 
Updated on: 

संघपाल वाहूळकर

जालना : जिल्ह्यात एकही मद्यनिर्मिती उद्योग नसतानाही राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जालना कार्यालयाने महसूल वसुलीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात शासनाने दिलेल्या १३ कोटी ५४ लाख रुपयांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत विभागाने १३ कोटी ६० लाख ४५ हजार रुपयांचा महसूल जमा केला. त्यामुळे निर्धारित उद्दिष्टाच्या १००.४८ टक्के वसुलीची नोंद झाली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत महसुलात ३०.१६ टक्क्यांची वाढ झाली असून, तब्बल ३ कोटी १५ लाख २६ हजार रुपयांचा अतिरिक्त महसूल जमा झाला आहे.

उपलब्ध आकडेवारीनुसार, सन २०२३-२४ मध्ये विभागाने १० कोटी ४५ लाख १९ हजार रुपयांचा महसूल जमा केला होता. त्या तुलनेत २०२४-२५ मध्ये महसूल वसुलीने लक्षणीय वाढ नोंदवली. विशेष म्हणजे, मार्च २०२५ या एकाच महिन्यात तब्बल ११ कोटी १४ लाख ६६ हजार रुपयांचा महसूल जमा झाला. वार्षिक महसूल वसुलीमध्ये मार्च महिन्याचा मोठा वाटा राहिला.

Money
Marathwada University Logo Misuse: विद्यापीठाच्या लोगोचा गैरवापर करत ठेकेदाराकडून कुशल कामगारांची भरती

जून २०२४ मध्ये ६८ लाख २७ हजार रुपये, ऑगस्टमध्ये ३० लाख ८८ हजार रुपये, तर जुलैमध्ये २६ लाख २५ हजार रुपयांचा महसूल जमा झाला. एप्रिल ते फेब्रुवारी या कालावधीत महिन्यानुसार महसूल संकलनात चढ-उतार दिसून आले. मात्र, मार्चमधील मोठ्या वसुलीमुळे विभागाने वार्षिक उद्दिष्ट ओलांडले.

सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी शासनाने जालना जिल्ह्याला १५ कोटी १३ लाख रुपयांचे महसूल वसुलीचे उद्दिष्ट दिले आहे. या आर्थिक वर्षाच्या एप्रिल आणि मे या पहिल्या दोन महिन्यांतच विभागाने ८३ लाख ८८ हजार रुपयांचा महसूल जमा केला आहे. मागील वर्षाच्या याच कालावधीत ३६ लाख १६ हजार रुपयांचा महसूल जमा झाला होता. त्या तुलनेत चालू वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत महसुलात १३१.९९ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. यामध्ये मे २०२५ महिन्यात ६० लाख ४२ हजार रुपयांचा महसूल जमा झाला. त्यामुळे आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच महसूल वसुलीला गती मिळाल्याचे दिसून येते. जिल्ह्यात मद्यनिर्मिती उद्योग नसल्याने परवाना नूतनीकरण शुल्काचा महसूल संकलनात मोठा वाटा असल्याचे दिसून येत आहे.

९० टक्के महसूल नूतनीकरण शुल्कातून

जालना जिल्ह्यात एकही मद्यनिर्मिती उद्योग किंवा घटक कार्यरत नाही. असे असले तरी जिल्ह्यातील एकूण महसुलापैकी सुमारे ९० टक्के महसूल मद्यविक्री परवान्यांच्या वार्षिक नूतनीकरण शुल्कातून मिळत असल्याची माहिती देण्यात आली आहे. परवाना शुल्कावर महसुलाची भिस्त अवलंबून आहे. मद्यनिर्मिती नसतानाही परवाना नूतनीकरण आणि संबंधित शुल्काच्या माध्यमातून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल संकलनात मोठी भर पडत आहे. ही बाब आकडेवारीवरून दिसून येत आहे. या वर्षी देखील गत वर्षीच्या तुलनेत महसुलाचे उद्दिष्ट वाढवून देण्यात आले आहे.

Money
Chhatrapati Sambhajinagar water supply : हर्सल टी पॉइंटवर पुन्हा फुटली ७०० मिमीची जलवाहिनी

२०२४-२५ मध्ये वार्षिक महसुलात ३.१५ कोटींची वाढ

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात १३.५४ कोटी रुपयांचे उद्दीष्ट होते. २०२४-२५ मधील प्रत्यक्ष वसुली ही १३.६० कोटी इतकी राहिली. २०२३-२४ मधील वसुली १०.४५ कोटी होती. यात वार्षिक महसूल वाढ ३.१५ कोटी इतकी झाली. वाढीची टक्केवारी ३०.१६ टक्‍के इतकी आहे. एकूण उद्दिष्टपूर्ती १००.४८ टक्‍के इतकी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news