Jalna drought : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख, शेतमजुरांना २५ हजार रुपये द्या

माजी आमदार चंद्रकांत दानवे : राष्ट्रवादी काँग्रेस श. प. पक्षाच्यावतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
Jalna drought
भोकरदनः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये देण्याच्या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले .pudhari photo
Published on: 
Updated on: 

भोकरदन : दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी, शेतमजूर व ग्रामीण नागरिकांना तातडीने दिलासा देण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर एक लाख रुपये आणि शेतमजुरांना २५ हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी माजी आमदार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे यांनी केली. भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्यवतीने बुधवार, दि. ७ रोजी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.

यात म्हटले आहे की, पावसाने मोठा खंड दिल्याने मका, सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, ज्वारी, ऊस व फळबागांसह विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे वंचित तालुक्यांचा दुष्काळग्रस्त म्हणून समावेश करावा, जमीन महसूल माफ करावा, पात्र कर्जमाफी करावी, तातडीने पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, कृषी पंपांची वीजबिले माफ करून दिवसा १२ तास वीजपुरवठा करावा, पीकविमा, पीएम-किसान, दुष्काळी अनुदान, विविध कृषी योजना, वैयक्तिक विहिरी व घरकुलांचे प्रलंबित लाभ तातडीने द्यावेत. आदी मागण्या करण्यात आले आहेत.

Jalna drought
Surla Mining Dump | सुर्ला येथील खाण डंप हाताळणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध; जनआंदोलनाचा इशारा

तसेच दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची शैक्षणिक व वसतिगृह फी माफ करावी, रोजगार हमीची कामे सुरू करावीत, पिण्याचे पाणी व पशुधनासाठी टँकर उपलब्ध करून द्यावेत, शेतकरी-शेतमजूर कुटुंबांना २५ किलो धान्य मोफत द्यावे तसेच जलसंधारणाची कामे विशेष निधीतून हाती घ्यावीत, फळबाग, केळी, ऊस व धान पिकांच्या नुकसानीची तातडीने भरपाई द्यावी. मागील दुष्काळ, अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीतील प्रलंबित अनुदाने वितरित करावीत आदी मागण्या करण्यात आले आहेत.

यावेळी युवानेते .सुधाकर आण्णा दानवे, तालुकाध्यक्ष रमेशशेठ सपकाळ, तालुकाध्यक्ष रामधन कळंबे, युवक तालुकाध्यक्ष प्रा. डॉ.अंकुश जाधव सर, जिल्हासरचिटणी संग्रामराजे देशमुख, जिल्हाउपाध्यक्ष लक्ष्मण ठोंबरे, त्र्यंबक आप्पा पाबळे, युवक तालुकाध्यक्ष नितीन शिवनकर, गटनेते शफिक शेठ पठाण, नगरसेवक नसिम पठाण, अब्दुल कदिर बापु, जयराम मुठ्ठे, रघुनाथ पंडीत, रावसाहेब दाभाडे, रामदास रोडे, गजानन वनार्से, इसरारखॉ पठाण, रमेश पा.बरडे, धनराज भारती, उखाजी कोरडे, सुनिल लोखंडे, पुंजाराम साबळे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Jalna drought
Sambhajinagar corporator disqualification hearing : नगरसेवक अपात्रता सुनावणी पुन्हा लांबणीवर

शहराचा पाणीप्रश्न ऐरणीवर

भोकरदन नगरपरिषदेचे गटनेते शफिकशेठ पठाण यांनी भोकरदन शहराच्या पाणीप्रश्नाकडे लक्ष वेधत खडकपूर्णा धरण व पद्मावती धरणातून शहरासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली. दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर व ग्रामीण जनतेला केवळ आश्वासनांऐवजी प्रत्यक्ष मदत मिळणे आवश्यक असून, शासनाने निवेदनातील मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी चंद्रकांत दानवे यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news