Jalna Crime News : शेतात लिंबू टाकल्याच्या संशयावरून महिलांना मारहाण

"तू आमच्या शेतात लिंबू का टाकले?" अशी विचारणा केली असता, त्याने शिवीगाळ करून लोखंडी चिमटा दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली.
Jalna Crime News
Jalna Crime News : शेतात लिंबू टाकल्याच्या संशयावरून महिलांना मारहाणfile photo
Published on
Updated on

Jalna Crime News : Women beaten up on suspicion of throwing lemons in fields

जालना, पुढारी वृत्तसेवाः शिरनेर (ता. अंबड) येथे शेतात लिंबू टाकल्याच्या संशयावरून झालेल्या वादातून, फिर्यादीच्या आईला आणि पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे.

Jalna Crime News
Beed Crime News : परळीत महिला महाविद्यालयातील कर्मचाऱ्यास घरातून घेऊन जाऊन अमानुष मारहाण

अमोल राम मंडलीक (२७, रा. शिरनेर, ता. अंबड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ९ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या शेताजवळ अनिल अर्जुन गायके हा दिसला होता. अमोल यांनी त्याला "तू आमच्या शेतात लिंबू का टाकले?" अशी विचारणा केली असता, त्याने शिवीगाळ करून लोखंडी चिमटा दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली.

यानंतर, अमोल यांची आई आणि पत्नी हे या प्रकाराबाबत विचारणा करण्यासाठी अनिल गायके यांच्या घरी गेले असता, तिथे अनिल गायके, शांताबाई अर्जुन गायके, कोंडाबाई उर्फ सविता अनिल गायके, सूनिल अर्जुन गायके आणि अर्जुन माणिकराव गायके यांनी मिळून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि खाली पाडले. या झटापटीत अमोल यांच्या आईच्या गळ्यातील पोत कोठेतरी पडली असून, त्यांना व पत्नीला मुक्का मार लागला आहे.

Jalna Crime News
Parbhani Crime : शेतजमिनीच्या वादातून मारहाण; दोघांवर गुन्हा

याप्रकरणी अमोल मंडलीक यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news