Manoj Jarange : २९ चे आंदोलन शेवटचे, निर्णायक

मनोज जरांगे यांचा इशारा, समाजबांधवांची घेतली बैठक
Manoj Jarange Patil
Manoj Jarange : २९ चे आंदोलन शेवटचे, निर्णायकManoj Jarange Patil
Published on
Updated on

Manoj Jarange: The agitation on the 29th will be the final, decisive one

जालना, पुढारी वृत्तसेवा : २९ ऑगस्टचे मराठा आंदोलन हे एक आंदोलन नसून मराठा समाजाच्या आरक्षण लढ्याचा निर्णायक टप्पा असल्याचे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. हे आंदोलन शेवटचे आणि निर्णायक असेल, असे सांगत त्यांनी समाजबांधवांना आतापासूनच तयारीला लागण्याचे आवाहन केले.

Manoj Jarange Patil
Load shedding Jalna: १२ तासांपासून पारध बु अंधारात; लाईटचा नुसता लपंडाव, दोनदा आली अन् चारदा गेली..!

आंदोलनाच्या अनुषंगाने जरांगे यांनी गोदाकाठच्या १२३ गावातील मराठा समाजबांधवासोबत बैठक घेतली त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आंदोलनाच्या व्यवस्थापनासाठी विचार करण्यात आल्याचे सांगून भोजन, पाणी व्यवस्थेबाबत ग्रामस्थांना सहकार्याची सूचना केल्याचे सांगितले.

Manoj Jarange Patil
Jalna News | झोका खेळता खेळता गळ्याला लागला फास; पाचवीतील विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू!

आंदोलनस्थळी प्रत्येक घरातून भाकरी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, टँकर, वैद्यकीय सुविधा आदी वर बैठकीत विचार झाला. आंदोलन दीर्घकाळ चालल्यास कोणतीही अडचण निर्माण होता कामा नये. 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र आणि सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय सरकारला सुट्टी नाही आणि एक मिनिटाचाही वेळ देणार नाही, असे जरांगे यांनी नमूद केले. आंदोलनासाठी लाखोंच्या संख्येने मराठा समाजाने येण्याचे आवाहन त्यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news