

Jalna Crime News: Two country-made pistols and cartridges seized.
जालना, पुढारी वृत्तसेवाः येथील सदर बाजार पोलिस ठाण्याच्या डीवी पथकाने दोन तरुणांच्या ताब्यातून दोन गावठी कट्ट्यासह अकरा जिवंत काडतूस जप्त केले.दोन्ही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सचिन सानप यांना खबऱ्याने माहीती दिली की,शहरातील काद्राबाद भागात राहणाऱ्या विक्की वीर हा पिस्टल बाळगत आहे. पोलिस निरीक्षक संदीप भारती यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार रंगे, पटेल, पोलिस कर्मचारी कटकम, शेख, गोफणे यांनी अलंकार टॉकीज परिसरातून विक्की वीर यास ताब्यात घेऊन गावठी कट्टा (अग्निशस्त्र) बाबत विचारणा केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यानंतर त्याने सदर गावठी कट्टा शिवम राजपूत (रा. राजपूतवाडी ता.जालना) याचे असल्याचे सांगुन सध्या ते विक्रम कुलधे याच्याकडे ठेवले असल्याची माहिती दिली.
पोउपनि सानप व पथकाने विक्रम कुलथे यास सामनगाव रोडवरील मयुरी पार्क भागातून ताब्यात घेतले . यावेळी त्याच्याकडे गावठी कट्टा (अग्निशस्त्र) बाबत विचारणा केली असता त्याने ही त्याच्याकडील दोन गावटी कट्टे व अकरा जिवंत काडतूस मी व शिवम राजपूत या दोघांनी एका आडाखाली खड्डा खोदून पुरून ठेवल्याचे सांगितले.
सदर बाजार डिबी पथकाने पुरुन ठेवलेले दोन काडतुसे व जिवंत काडतूस जप्त केले. सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधिक्षक आयुष नोवाणी, उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी, पोलिस निरीक्षक संदीप भारती साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सचिन सानप, जमादार रामप्रसाद रंगे, नजोर पटेल, जगनाथ जाधव, धनाजी कावळे, शिवहरी डिघोळे, पोलिस कर्मचारी अजोम शेख आदीनी केली.
एकाचा शोध
सदर प्रकरणात सदर बाजार पोलिसांनी तीन आरोपितांविरुदध गुन्हा दाखल केला असून त्यातील एका आरोपी मिळून न आल्याने त्याचा शोध पोलिस घेत आहेत पुढील तपास पोउपनि सचिन सानप हे करीत आहेत.