

Jalna Crime: Innkeeper Kuldeep alias Jajya arrested
जालना,पुढारी वृत्तसेवाः जालना शहरातील रेल्वेस्टेशन भागातील जमुनानगर भागातील सराईत गुन्हेगार कुलदीप ऊर्फ जज्या अंबादास जगधने यास कदीम जालना पोलीसांनी केले शिताफीने जेरबंद केले.कदीम जालना पोलिसांनी दिलेल्या प्रस्तावानंतर सदर आरोपीस एक वर्षासाठी स्थानबध्द करण्याचे आदेश दिले होते.त्यानंतर सदर इसम फरार झाला होता.कदीम जालना पोलिसांनी त्यास ताब्यात घेउन छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल कारागृहात स्थानबध्द केले.
जालना शहरातील सराईत गुन्हेगार यांच्यावर प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले होते. कदीम जालना पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार कुलदीप ऊर्फ जज्या अंबादास जगधने यांच्यावर कदीम जालना पोलीस ठाण्याचे निरीक्षक जनार्धन शेवाळे यांनी महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती यांच्यावर विघातक वाळु तस्कर व अत्यावश्यक वस्तुचा काळा बाजार करणा-या व्यक्ती बेकायदेशीर जुगार, बेकायदेशीर लॉटरी चालविणाऱ्या व्यक्ती आणी मानवी अपव्यापार करणाऱ्या व्यक्ती यांचा विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत प्रस्ताव तयार करून उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस अधीक्षक यांच्या जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आली होती.
प्रस्तावाचे अवलोकन करून जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधीकारी यांनी सदर गुन्हेगारास 01 वर्षाकरिता मध्यवर्ती कारागृह हर्सूल छत्रपती संभाजीनगर येथे स्थानबध्द करण्याचे आदेश पाति केले होते. तेव्हापासून सदर स्थानबध्द इसम फरार असल्यांने सदर गुन्हेगाराचा पोलिस शोध घेत होते.
30 डिसेबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास सदरचा गुन्हेगार हा आनंदनगर येथे मित्राला भेटण्यासाठी येणार असल्याची माहीती पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांना मिळाल्यानंतर त्यांनी स्वतः व कदीम जालना पोलिस ठाण्याकडील अंमलदार यांचा आनंदनगर परिसरात सापळा लावला होता.
सदरचा गुन्हेगार हा मित्राच्या घरी जात असताना पोलिसांनी त्यास शिताफीने ताब्यात घेऊन उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सदर स्थानबध्द इसम कुलदीप ऊर्फ जज्या अंबादास जगधने व यास एमपीडीए कायद्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगर येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्याची कारवाई सुरू केली आहे.
यांनी केली कारवाई
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक अजय कुमार बसंल, अप्पर पोलिस अधीक्षक आयुष ोपानी, उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जनार्दन शेवाळे, जमादार एस.व्ही.राठोड, पोलिस कर्मचारी बाबा गायकवाड, एस.व्ही.चव्हाण, मतीन शेख, धम्मपाल सुरडकर यांनी केली आहे.