Jalna Crime News : कुक्कडगांव येथे शेतकऱ्याने जीवन संपवले

अंबड तालुक्यातील कुक्कडगांव येथे ही घटना घडली.
Jalna Crime News
Jalna Crime News : कुक्कडगांव येथे शेतकऱ्याने जीवन संपवलेFile Photo
Published on
Updated on

Jalna Crime News : A farmer ended his life in Kukkadgaon

सुखापूरी पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील कुक्कडगांव येथे 44 वर्षीय शेतकरी ज्ञानेश्वर रामराव गायकवाड यांनी आज सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले.

Jalna Crime News
पऱ्हाट्यावर पेटवून घेत शेतकऱ्याने जीवन संपविले

सकाळी साडेसातच्या सुमारास घरातील पत्र्याच्या शेडमध्ये लोखंडी अँगलला वायरने गळफास घेतल्याचे आढळले. वडील रामराव गायकवाड यांनी हा प्रकार पाहताच आरडाओरड केल्याने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. दुपारी तीन वाजता गावातील स्मशानभूमीत त्‍यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Jalna Crime News
किरकोळ वादातून युवकावर कत्तीने वार; संतप्त जमावाने स्कॉर्पिओ जाळली

आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट नसून कर्जबाजारीपणामुळे हे पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news