आन्वा : भोकरदन तालुक्यातील आन्वासह परिसरात में महिन्यात आणि जून महिन्यात मल्चिंग पेपरवर लागवड केलेल्या मिरची पिकावर बुरशी रोगाचा प्रादुर्भाव पडत असल्याने शेकडो हेक्टर मिरची पिके धोक्यात आले असल्याने अनेक शेतकऱ्यांनी मिरचीचे पीक उपटून टाकले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.
भोकरदन तालुक्यातील आन्वासह परिसरात अनेक शेतकऱ्यांनी पाऊस उशिरा आल्याने उन्हाळ्यात हजारो रुपये खर्च करून मिरची जगवली मात्र मिरची पिकाला जमिनीपासून बुरशीचा प्रादुर्भाव पडल्याने लगडलेल्या मिरचीने पिकाला ग्रासले असून शेकडो हेक्टरवरील पिके वाळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक शेतकऱ्यांनी त्यावर अनेक उपाय करत विविध औषधी सोडत आहे. मात्र त्याचा कुठलाही फायदा होत नसल्याने कृषी विभागाने मिरची उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहेत.
भोकरदन तालुक्यात मिरची उत्पादकासाठी मोठे मार्केट असून प्रसिद्ध असल्याने दरवर्षी परिसरात पाच हजार हेक्टरवर मिरचीची लागवड केली असून अनेक शेतकऱ्यांनी सुरुवातीला मिरचीचा चार ते पाच हजार रुपयांचा दोन तीन तोडे अस भाव मिळाला होता. अनेक शेतकऱ्यांनी एप्रिल मे महिन्यात मिरर्च लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी एकर एक ते दोन लाख रुपयांचा खर्च आल असून यंदा सुरुवातीपासून मिरचील कमी भाव मिळाला आहे. तर त्यातच मिरची पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव वाढत चालला असल्याने हे पीक धोक्यात आले आहे.