

Heavy Rain in Jalna
जालना - जालना जिल्ह्यात कुलाबा वेधशाळेने १ ते ४ सप्टेंबर यत्लो अलर्टचा इशारा दिल्यानंतर भोकरदन तालुक्यातील धावता, पिंपळगाव रेणुकाई व बरुड मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली, जिल्ह्यात भोकरदन तालुक्यात दमदार तर इतर तालुक्यात रिमझिम पावसाची नोंद झाली आहे.
जालना जिल्ह्यात सततच्या पावसामुळे खरीप पिकाचे मोठे नुकसान होत आहे. सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून पिके पिवळी पडत आहेत. कुलाबा वेधशाळेने १ ते ४ सप्टेंबरदरम्यान यलो अलर्ट जारी करण्याचा इशारा दिल्यानंतर सोमवारी रात्री भोकरदन तालुक्यात जोरदार पाऊस झाला. पिंपळगाव रेणुकाई मंडळात चोवीस तासांत ७१, श्रावडा ६९, वरुड ६६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. भोकरदन शहरात मंगळवारी सकाळपर्यंत ५२ तर सिपोरा मंडळात ४७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात चोवीस तासांत १६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. बलो अलर्ट नंतर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडला नसल्याचे चित्र आहे. सततच्या पावसामुळे सोयाबीन, कापूस, मूग, तूर, मकासह इतर पिकांचे नुकसान होत आहे.
पिंपळगाव रेणुकाई मंडळात मोठे पाऊस नसल्याने विहिरी, तलाव व नद्या व ओढे कोरडे होते. सोमवारी रात्री पडलेल्या जोरदार पावसामुळे वडोद तांगडा येथील रायघोळ नदी पहिल्यांदाच दुथडी भरून वाहिली. या पावसामुळे आगामी काही दिवसांत विहिरीतील पाणी पातळीत वाढ होणार असल्याने शेतकन्यांत आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. जिल्ह्यातील काही भागात पाऊस जास्त पडत असतानाच काही भाग तहानलेलाच होता. सोमवारी रात्री पडलेल्या पावसामुळे पा भागातही पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
जालना जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६०३ मि.मी. असताना जिल्ह्यात आजपर्यंत ५९२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. भोकरदन ५२९, जाफराबाद ६०७, जालना ५८८, अंबड ४९७, परतूर ५०३, मंठा ५४०, घनसावंगी ५७३ मि.मी. पावसाची मंगळवारपर्यंत नोंद झाली आहे. जिल्ह्यातील परतूर, घनसावंगी, अंबड, जालना व बदनापूर तालुक्यातील काही भागांत यापूर्वी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तेथे पंचनामे पूर्ण झालेले नाहीत.