Jalna Crime : धारदार खंजीरासह तरुण ताब्यात

चंदनझिरा पोलिसांची धडक कारवाई
Jalna crime News
Jalna crime Newspudhari photo
Published on
Updated on

जालना : चंदनझिरा परिसरात हातात धारदार खंजीर घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या एका तरुणाला चंदनझिरा पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. आरोपीकडून लोखंडी धारदार खंजीर जप्त करण्यात आला असून, त्याच्याविरुद्ध चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांना ३ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास गुप्त माहिती मिळाली की, चंदनझिरा येथील रोहितास मंदिर परिसरात एक व्यक्ती हातात धारदार खंजीर घेऊन फिरत असून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांचे विशेष पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले.

Jalna crime News
Jalna chain snatching : सोनसाखळी, जबरी चोरीतील आरोपींच्या आवळल्या मुसक्या

दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास रोहितास मंदिर परिसरात संशयित सचिन परमेश्वर खरात (वय २६, रा. अशोक चौक, चंदनझिरा, जालना) हा हातात खंजीर घेऊन फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडून लोखंडी धारदार खंजीर जप्त करण्यात आला. त्यानंतर त्याच्याविरुद्ध पोहेकॉ. मारियो स्कॉट यांच्या फिर्यादीवरून चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक तेजस्वीरसिंग संधू, अपर पोलिस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किरण बिडवे, पोहेकॉ. मारियो स्कॉट, पोहेकॉ. राजेंद्र पवार, पोकॉ. कृष्णा तंगे व पोकॉ. सागर खोरे यांनी केली.

Jalna crime News
Chhatrapati Sambhajinagar doctors strike : ८० टक्के खासगी डॉक्टरांच्या 'बंद'मुळे ओपीडी सेवा ठप्प

जालना शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. पोलिस कारवाई करूनदेखील गुन्ह्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news