Jalna chain snatching : सोनसाखळी, जबरी चोरीतील आरोपींच्या आवळल्या मुसक्या

कदीम जालना पोलिसांची कारवाई; ११.३१ लाखांचा मुद्देमाल जप्त, ६ गुन्हे उघडकीस
Jalna chain snatching
जालनाः पत्रपरिषदेत माहिती देताना पोलिस अधीक्षक तेगबिर सिंग संधू व इतर अधिकारी. तर आरोपींकडून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल. (छायाः शरद खानापुरे)
Published on
Updated on

जालना : कदीम जालना पोलिस ठाण्याच्या पथकाने चेन स्नॅचिंग व जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा यशस्वी छडा लावत सहा गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल ११ लाख ३१ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती पोलिस अधीक्षक तेघबीर सिंग संधू यांनी दिली.

या संदर्भात मंगळवार, दि. ४ रोजी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. दरम्यान, पाेलिस अधीक्षक तेघबीर सिंग संधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कदीम जालना पोलिस ठाण्याचे निरीक्षक जनार्दन शेवाळे व तपास पथकाने तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी पाच चेन स्नॅचिंग आणि एका जबरी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली.

Jalna chain snatching
Scheduled Castes Sub Classification Opposition|अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाला विरोध

या कारवाईत सुमारे ६८.१९० ग्रॅम सोन्याचे दागिने, दोन मोबाईल फोन आणि एक डिस्कव्हर मोटारसायकल असा एकूण ११.३१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त दागिन्यांमध्ये सोन्याच्या चेन, लॉकेट, अंगठ्या, मंगळसूत्र, मिनी गंठन तसेच इतर दागिन्यांचा समावेश आहे.

या प्रकरणी आदित्य सुरेश पाखरे (वय १९) व अरुण दगडू वाघचौरे (वय १९, दोघेही रा. चंदनझिरा, जालना) यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे.

ही कारवाई अप्पर पोलिस अधीक्षक विक्रम साळी व उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जनार्दन शेवाळे, पोउपनि दिनकर मोरे, पोहेकॉ. सचिन चौधरी, सदा राठोड, धनाजी कावळे, पोकाँ. मतीन शेख, पोकाँ. इम्रान खान, दिलीप गायकवाड, सदाशिव मुटकुळे आदींनी केली.

Jalna chain snatching
Chhatrapati Sambhajinagar doctors strike : ८० टक्के खासगी डॉक्टरांच्या 'बंद'मुळे ओपीडी सेवा ठप्प

आरोपींची गुन्ह्याची कबुली

पाेलिसांनी केलेल्या चौकशीत दोन आरोपींनी पाच चेन स्नॅचिंग आणि एका जबरी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून सुमारे ११.३१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news