Jalna Crime : महिलेची सोनसाखळी चोरणारे आरोपी जेरबंद

आरोपींकडून आयफोनसह सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल केला जप्त
Jalna chain snatching case
जालना : शहरातील शिक्षक कॉलनीत राहणाऱ्या महिलेची सोनसाखळी हिसकावून चोरी करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी पकडल्यानंतर आरोपी व मुद्देमालासह पोलिस अधिकारी व कर्मचारी.pudhari photo
Published on
Updated on

जालना : जालना शहरातील महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने अवघ्या काही दिवसांत जेरबंद केले. या कारवाईत एक विधिसंघर्षित बालकास ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून ३ लाख २५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ जुलै रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शिक्षक कॉलनी परिसरातील रहिवासी अनिता गोपाळ अवघड (वय ६०) या नवीन मोंढा रोडवरील विठ्ठल मंदीराजवळुन जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या गळ्यातील आठ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी हिसकावून पळ काढला होता. याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Jalna chain snatching case
Belgaum theft gang : चोरट्यांच्या आंतरराज्य टोळीला अटक

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक तेजबीर सिंह संधू यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासा दरम्यान रोहन योगेश जाधव (रा. साजापूर, ता. वाळूज छत्रपती संभाजीनगर) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्यासोबत एका विधिसंघर्षित बालकाचाही सहभाग निष्पन्न झाला.

ही कारवाई पोलिस अधीक्षक तेजबीर सिंह संधू, अपर पोलिस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्ण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पान पाडली.

Jalna chain snatching case
Solapur Jewellery Shop Theft: सोन्याच्या दुकानात चोरी करणाऱ्या दोन आंतरजिल्हा गुन्हेगारांना अटक

दुचाकीचा वापर

आरोपींकडून ५० हजार रुपयांची सोन्याची साखळी, २ लाख २५ हजार रुपयांची यामाहा दुचाकी आणि ५० हजार रुपयांचा आयफोन-१४ मोबाईल, असा ३ लाख २५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news