

शहागड : अंबड तालुक्यातील गहिनीनाथ नगर येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस क्र.एम.एच.-09,एफ.एल.0542 ही बस जालना वरुन गेवराई जात असताना छत्रपती संभाजीनगर सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर गहिनीनाथ नगर जवळ बसचे समोरील डाव्या बाजूचे टायर अचानक फुटल्याने चालक राजु राठोड यांनी गाडीवर ताबा मिळवून गाडी सुरक्षित महामार्गावर बाजूला थांबवली.
चालकाच्या सतर्कतेमुळे बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असून बसमध्ये एकुण १५ प्रवासी प्रवास करत होते असे वाहक श्रीमती खिल्लारे यांनी दैनिक पुढारी प्रतिनिधी यांच्याशी बोलताना सांगितले.
बसमध्ये स्टेफनी टायर नाही,जॅक,पाहणा हे साहित्य नसल्याने महामंडळाच्या बसेस रामभरोसे प्रवास करतात. बस प्रवासी सलीम शहा यांनी सांगितले की बसचे अचानक टायर फुटल्याने जोरदार आवाज झाला. त्यामुळे आम्ही गोंधळून गेलो,चालक राजु राठोड यांच्या सतर्कतेमुळे कोणालाही दुखापत न होता सर्व प्रवासी सुखरूप आहे.