

जालना: ब्राह्मण समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या पाच दिवसांपासून जालना शहरातील गांधी चमन येथे आमरण उपोषणाला बसलेले समाजनेते दीपक रणनवरे यांनी अखेर आपले उपोषण मागे घेतले. भाजपचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी उपोषणस्थळी प्रत्यक्ष भेट देऊन शासन आणि आंदोलक यांच्यात समन्वय साधल्याने या अन्नत्याग आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी अंबाजोगाई पेशवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी प्रा. राहुल कुलकर्णी, डॉ महेश अकोलकर, योगेश जानतीकर, संजय देशपांडे, मधुसूदन दंडारे, आर. आर. जोशी, अरविंद देशपांडे, दिलीप जोशी, ॲड. बळवंत नाईक, भूषण जोशी, राहुल यादनिक, अनिल दीक्षित, सिध्दिविनायक मुळे उपस्थित होते.