

Bhokardan Taluka Theft Case
आन्वा : भोकरदन तालुक्यातील वाकडी व कुकडी गावातील शिवारात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. कृषी पंपासह धान्याचे पोती चोरून नेली आहेत. या प्रकारामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी चोरीच्या घटनांना आळा घालावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
या संदर्भात भोकरदन पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. की कुकडी येथील अशोक निक्कम (फौजी) यांच्या घराबाहेर ठेवलेल्या हरभराचे कट्टे पोते अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास चोरी करून लंपास केले आहे.
तसेच आन्वा भोकरदन रस्त्यावरील कुकडी शिवारातील गट नंबर 74 मधील अब्बास गुलाब शेख यांच्या शेतातील पाच एचपी कृषिपंप मोटार अज्ञात चोरट्यांनी चोरी करून फरार झाले आहेत. त्यामुळे कुकडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गुरुवारी (दि.२०) वाकडी येथील श्रीरंग वाघ यांचे घरासमोरून सोयाबीनचे दहा पोते तर कुकडी येथील रामधन निकम यांच्या शेतातील बैल गोठ्यातून कापसाचे तीन गठ्ठे किमान दोन क्विंटल कापूस चोरीस गेले असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहेत.