Jalna Tourism | भोकरदन तालुक्यातील कालिंका माता परिसर हिरवाईने नटला; निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

कालिंका माता मंदिर परिसरात सर्वत्र घनदाट झाडी आणि हिरवळ पसरली असून, पावसाळी वातावरणामुळे येथील सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे
Jalna Bhokardan Kalinka Mata
Jalna Bhokardan Kalinka MataPudhari
Published on
Updated on

Jalna Bhokardan Kalinka Mata

भोकरदन : तालुक्यातील धावडा परिसरातील प्रसिद्ध कालिंका माता मंदिर व आसपासचा डोंगररांगांचा भाग सध्या हिरव्यागार निसर्गरम्य सौंदर्याने नटला आहे. पावसाळ्याच्या दिवसांत डोंगरदऱ्यांनी पांघरलेली हिरवी शाल आणि निसर्गाचे विलोभनीय रूप पर्यटकांना तसेच निसर्गप्रेमींना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करत आहे.

निसर्गाची मनमोहक भुरळ

कालिंका माता मंदिर परिसरात सर्वत्र घनदाट झाडी आणि हिरवळ पसरली असून, पावसाळी वातावरणामुळे येथील सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे. धुक्याची शाल, झुळझुळणारा वारा आणि डोंगरमाथ्यावरील नयनरम्य दृश्ये अनुभवण्यासाठी नागरिक कुटुंबीयांसह व मित्रांसोबत येथे आवर्जून भेट देत आहेत.

Jalna Bhokardan Kalinka Mata
Jalna accident: अंढेरा फाट्यावर महसूल पथकाच्या वाहनाला टिप्परची धडक; तहसीलदारांसह चौघे बचावले

पर्यटकांची मोठी गर्दी

वीकेंड तसेच सुट्टीच्या दिवशी येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. परिसरातील तरुण, ज्येष्ठ नागरिक व स्थानिक नागरिक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आणि निसर्ग भ्रमंती (ट्रेकिंग) करण्यासाठी या भागात पोहोचत आहेत. पर्यटन व निसर्गप्रेमासोबतच स्थानिक पोलीस प्रशासन व नागरिक सुरक्षेची काळजी घेत निसर्ग पर्यटन करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

पर्यटनाला चालना मिळण्याची मागणी

धावडा परिसरातील हा निसर्गरम्य आणि धार्मिक ठेवा पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. या भागातील नैसर्गिक सौंदर्याचा विकास करून येथे पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यास हा परिसर एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास येऊ शकतो, अशी भावना स्थानिक नागरिक व पर्यटकांकडून व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news