Jalna Tur Soyabean Rate : तुरीला ७,९०० तर सोयाबीनला ६,९५० रुपयांचा कमाल भाव

कृषी बाजार समितीत ४,२८१ क्विंटल शेतमालाची आवक
Jalna Tur Soyabean Rate
तुरीला ७,९०० तर सोयाबीनला ६,९५० रुपयांचा कमाल भावpudhari photo
Published on
Updated on

जालना : कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी (दि. १० जुलै) विविध शेतमालाची एकूण ४,२८१ क्विंटल आवक झाली. दिवसभरात झालेल्या व्यवहारांचे एकूण मूल्य १ कोटी ६७ लाख ८८ हजार ६७५ रुपये इतके नोंदविण्यात आले.

आजच्या लिलावात तूर या पिकाला प्रति क्विंटल ७,९०० रुपये असा सर्वाधिक कमाल भाव मिळाला, तर सोयाबीनला ६,९५० रुपये आणि उडीद व मुगाला ६,७०० रुपये कमाल दर मिळाला.

Jalna Tur Soyabean Rate
Jalna News : पांढऱ्या तुरीला ७,८०० तर राईला ७,९५० रुपयांचा सर्वोच्च दर !

आज गव्हाची १,३३९ क्विंटल आणि ज्वारीची १,०५६ क्विंटल अशी सर्वाधिक आवक झाली. गव्हाला २,३५० ते २,६७५ रुपये, ज्वारीला २,२०० ते ४,५०० रुपये, बाजरीला २,००० ते २,७०१ रुपये, तर मक्याला २,१५० ते २,३२५ रुपये दर मिळाला.

हरभऱ्याला ५,००० ते ५,८०० रुपये, सोयाबीनला ५,४५० ते ६,९५० रुपये, उडीद व मुगाला ६,७०० रुपये, तर गुळाला ४,००० ते ४,४५० रुपये दर मिळाल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीने दिली.

Jalna Tur Soyabean Rate
Chakan Onion Prices: चाकण बाजार समितीत कांद्याच्या भावात वाढ; हिरवी मिरची, टोमॅटोची मोठी आवक

दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे बाजार समितीत भाजीपाल्याची आवक देखील चांगली होत आहे.

प्रमुख बाजारभाव

  • तूर : ६,४०० ते ७,९००

  • सोयाबीन : ५,४५० ते ६,९५०

  • हरभरा : ५,००० ते ५,८००

  • उडीद : ५,२०० ते ₹६,७००

  • मूग : ६,७०० (स्थिर)

  • गहू : २,३५० ते २,६७५

  • ज्वारी : २,२०० ते ४,५००

  • बाजरी : २,००० ते २,७०१

  • मका : २,१५० ते २,३२५

  • गूळ : ४,००० ते ४,४५०

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news