Jalna News : बाजार समितीत तुरीला सर्वाधिक ९,२४६ रुपयांचा कमाल दर

५,९६६ क्विंटल आवक; सोयाबीनला ६,०११, ज्वारीला ६,००१ तर मुगाला ९,४०० रुपयांचा भाव
Agriculture News
Agriculture Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (दि. १ ) रोजी विविध शेतमालाची एकूण ५ हजार ९६६ क्विंटल आवक झाली. या शेतमालाच्या विक्रीतून तब्बल २ कोटी ६५ लाख १३ हजार ६९० रुपयांचे मूल्यांकन नोंदविण्यात आले. बाजार समितीतील दरानुसार तुरीला कमाल ९ हजार २४६ रुपये, मुगाला ९ हजार ४०० रुपये, उडदाला ९ हजार ८०० रुपये, तर सोयाबीनला ६ हजार १११ रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळाला.

ज्वारीची १ हजार ५३५ क्विंटल आवक झाली असून तिला कमाल ६ हजार १ रुपयांचा दर मिळाला. बाजरीची ४७४ क्विंटल आवक झाली असून कमाल दर ३ हजार रुपये राहिला. गव्हाची ८४१ क्विंटल आवक झाली असून त्यास कमाल २ हजार ९७५ रुपये दर मिळाला.

Agriculture News
Jalna Zilla Parishad : अग्निसुरक्षेचा सहा वर्षांचा वनवास संपला; यंत्रणा अद्ययावत

मका ६१ क्विंटल, तूर २७२ क्विंटल, हरभरा १६२ क्विंटल, मूग १०० क्विंटल, उडीद १२० क्विंटल, सोयाबीन १ हजार ७५२ क्विंटल इतका भाव मिळाला.

गुळाळी २२ क्विंटल आवक; ४१०० रु. भाव

जालना बाजारा समितीत गूळ २२ क्विंटल इतकी आवक झाली. गुळाला ४,१०० रुपये इतका दर मिळाला. तर मोसंबी ६१२ क्विंटल आवक झाली असून, सुमारे २,०४३ रुपये इतका प्रतिक्विंटल इतका दर मिळाला. सध्या जिल्हाभरात दुष्काळ पडला आहे. यामुळे येत्या काळात अजून दर वाढण्याची चिन्हे दिसून येत आहे. बाजार समितीच्या दैनंदिन आवक-भाव नोंदीनुसार हे दर नोंदविण्यात आले आहेत.

Agriculture News
Chhatrapati Sambhajinagar Crime : व्हॉट्सॲप ग्रुपमधून काढल्याच्या रागातून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यावर कटरने हल्ला

फळांना चांगला भाव

फळबाजारात प्रमुख फळपिकांची आवक होऊन शेतमालाला समाधानकारक दर मिळाला. ​सफरचंद: ८९ कॅरेट आवक झाली असून दर ६०० ते २,८०० रुपये (सरासरी १,८०० रुपये) राहिला. ​डाळिंब: ५९ कॅरेट आवक झाली असून दर ९०० ते २,८०० रुपये (सरासरी २,००० रुपये) मिळाला. ​ड्रॅगन फ्रूट: ३७ कॅरेट आवक झाली असून दर १,००० ते २,५०० रुपये (सरासरी १,८०० रुपये) नोंदवला गेला. ​संत्रा: २१ कॅरेट आवक झाली असून दर ८०० ते १,६०० रुपये (सरासरी १,२०० रुपये) राहिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news