Jalna Accident | अंबड-शहागड रस्त्यावर दोन ट्रकची समोरासमोर धडक: चालक ठार

वडिगोद्रीजवळ अपघात : विटा वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील चालक व चार मजूर सुदैवाने बचावले
Ambad Shahagad Road Truck Accident
Ambad Shahagad Road Truck AccidentPudhari
Published on
Updated on

Ambad Shahagad Road Truck Accident

वडिगोद्री : अंबड-शहागड रस्त्यावर वडिगोद्री येथे दोन ट्रकची समोरासमोर जोरदार धडक होऊन एक चालक जागीच ठार झाल्याची घटना घडली. या अपघातात विटा वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील चालक व चार मजूर सुदैवाने बचावले.

मृत चालकाचे नाव सादिक खान (वय ४४, रा. विक्री, ता. कासारवार, जि. खरगोन, मध्यप्रदेश) असे आहे. तर राजू मोहन बिलाल (वय ३५, रा. ढेकरी, जि. खरगोन, मध्यप्रदेश) आणि शेख अब्दुल मेहमूद (वय ४५, जि. बीड) हे जखमी झाले आहेत.

Ambad Shahagad Road Truck Accident
jalna crime news : भुवन घाटात वाळू उपशात हेराफेरी !

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच २० एटी ०९९९ क्रमांकाचा ट्रक शहागडकडून वडिगोद्रीकडे बांधकामासाठी विटा घेऊन येत होता. त्याचवेळी समोरून एमएच १८ बीझेड ७८६१ क्रमांकाचा मालवाहू ट्रक शहागडकडे जात असताना वडिगोद्रीजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली.

अपघात इतका भीषण होता की, मालवाहू ट्रकचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला. चालक गाडीत अडकून पडल्याने त्याला बाहेर काढण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने प्रयत्न करण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

Ambad Shahagad Road Truck Accident
Jalna water crisis : अबब..! एमआयडीसीला दररोज होतोय 4 एमएलडी पाणीपुरवठा

दरम्यान, विटा वाहणाऱ्या ट्रकमधील चालक व चार मजूर कोणतीही दुखापत न होता बचावले. अपघातात विटा वाहणाऱ्या ट्रकचा मागील भागही तुटून पडला. मृतदेह वडिगोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news