Jalna Crime | मुलानेच केला बापाचा निर्घृण खून; अंबड तालुक्यातील रुई गाव हादरले

घराच्या गच्चीवर झोपलेले असताना कुऱ्हाडीने हल्ला
Son Kills Father Jalna
दिलीप राजगुरू Pudhari
Published on
Updated on

Son Kills Father Jalna

सुखापुरी : अंबड तालुक्यातील रुई येथे कौटुंबिक वादातून मुलानेच वडिलांचा कुऱ्हाडीने खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. ९) समोर आली असून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

मृत दिलीप धुराजी राजगुरू यांच्यावर दि. ८ रोजी रात्री ते घराच्या गच्चीवर झोपलेले असताना कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. सकाळी हा प्रकार उघडकीस येताच गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी प्रल्हाद धुराजी राजगुरू यांच्या फिर्यादीवरून विशाल दिलीप राजगुरू तसेच एका विधीसंघर्ष बालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Son Kills Father Jalna
Jalna Crime : जालना शहरात लूटमार करणारी टोळी जेरबंद

प्राथमिक माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी दिलीप राजगुरू यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यांच्या दुसऱ्या विवाहाच्या निर्णयावरून घरात वाद सुरू होता. मोठ्या मुलांचा या निर्णयाला विरोध असल्याने हा वाद तीव्र झाला आणि त्याचेच रूपांतर या भीषण घटनेत झाल्याची चर्चा आहे.

घटनेची माहिती मिळताच तीर्थपुरी पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला आणि काही तासांतच आरोपीला अटक करण्यात आली.

या घटनेनंतर रुई गावात भीती, संताप आणि शोककळा पसरली आहे. “ज्याने मुलाला वाढवले, त्याच वडिलांचा जीव घेण्याइतका टोकाचा निर्णय कसा घेतला गेला?” असा प्रश्न ग्रामस्थांना अस्वस्थ करत आहे. ही घटना कौटुंबिक संवाद आणि सहनशीलतेचे महत्त्व अधोरेखित करणारी ठरत आहे.

Son Kills Father Jalna
Jalna Crime : बस कंडक्टरकडून महिलेस मारहाण

दरम्यान, घटनास्थळी अंबडचे उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर धुमाळ, तीर्थपुरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली पवार, तसेच भगवान शिंदे, अनिल मुसळे, नारायण माळी आणि फॉरेन्सिक पथकाने भेट देऊन तपासाची सूत्रे हाती घेतली, अशी माहिती रुई बीट जमादार भगवान शिंदे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news