Jalna Agricultural Produce Market Committee : चमकी मुगाला ८,५०० रुपयांचा भाव ! शाळू ज्वारीची रेलचेल

पांढऱ्या तुरीचा दर ८ हजारांच्या पार, जालना बाजार समितीत गव्हाची विक्रमी आवक
Sorghum fetches a premium price; rates touch ₹4,800
Jalna Agricultural Produce Market Committee : चमकी मुगाला ८,५०० रुपयांचा भाव ! शाळू ज्वारीची रेलचेलPudhari
Published on
Updated on

Jalna Agricultural Produce Market Committee news

जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत (एपीएमसी) बुधवार, दि. १९ रोजी विविध शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक पाहायला मिळाली. दिवसभरात ५ हजार ८५५ क्विंटल शेतमालाची आवक झाली असून, एकूण १ कोटी ८२ लाख ८० हजार ६७५ रुपयांची मोठी उलाढाल झाली आहे. आजच्या बाजारात गहू (४९६ वाण) आणि शाळू ज्वारीची तुफान आवक झाली, तर चमकी मुग आणि पांढऱ्या तुरीला सर्वाधिक चांगला भाव मिळाला.

Sorghum fetches a premium price; rates touch ₹4,800
Jalna News : महापालिकेच्या ९९३ पदांच्या आकृतिबंधास शासनाची मंजुरी

बाजारात चमकी मुगाला ८ हजार ५०० रुपये क्विंटल भाव मिळाला. शाळू ज्वारीसह गव्हाची सर्वाधिक आवक झाली. धान्य विभागात आज गव्हाचा बोलबाला राहिला. '४९६' या वाणाच्या गव्हाची २,१७५ क्विंटल आवक झाली, ज्याला किमान २,३०० रुपये तर कमाल २,६३० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला (सर्वसाधारण दरः ₹२,५८५), गव्हाच्या बाजारातून एकट्या ५६ लाख २२ हजार ३७५ रुपयांचे व्यवहार झाले. तसेच, शाळू ज्वारीला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

१,५६८ क्विंटल आवक झालेल्या शाळू ज्वारीला कमाल ५,२०० रुपये इतका चांगला दर मिळाला. ज्वारीची एकूण विक्री ५६ लाख ४४ हजार ८०० रुपयांवर पोहोचली. हिख्या बाजरीची ५५४ क्विंटल आवक झाली. बाजरीला कमाल दर २,५३० तर सर्वसाधारण २,४०० दर मिळाला. लाल मकाची १८१ क्विंटल आवक झाली. कमाल दर २,५०० तर सर्वसाधारण २,४०० इतका मिळाला. कडधान्य बाजारात मुग अन् तुरीला जोरदार भाव मिळाला.

Sorghum fetches a premium price; rates touch ₹4,800
Fraud Case : महिन्याला १० हजारांच्या पगाराचे आमिष दाखवून २० लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल

चमकी मुगाची ६ क्विंटलची आवक झाली असली तरी कमाल भाव ८,५०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. तर पांढरी तूरची २७० क्विंटल आवक झाली असून कमाल ८,०६८ रुपये तर सर्वसाधारण दर ७,८०० रुपये नोंदवला गेला. तुरीचे एकूण मूल्यांकन २१ लाख ६ हजार रुपये झाले. गावरान हरभराची २०६ क्विंटल आवक झाली. कमाल दर ६,२३० तर सर्वसाधारण दर ६, १०० रुपये राहिला.

मोसंबीची ७१५ क्विंटल आवक

जालना जिल्ह्याची ओळख असलेल्या मोसंबीची बाजारात ७१५ क्विंटल आवक झाली. मोसंबीला किमान ३४० रुपये, सर्वसाधारण ९८० रुपये आणि उत्तम दर्जाच्या फळाला कमाल १,७७३ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. मोसंबीची एकूण उलाढाल ७ लाख ७०० रुपये झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news