

शहागड : अबंड तालुक्यातील शहागड येथे दि. गुरुवारी पाहाटे तीन वाजता घरातून घरगुती भांडण झाल्याने रुसून राहत्या घरातून आखतवाडी शिव ता.शेवगाव जि.अहमदनगर हे दुचाकी बजाज क्र.एम.एच.12 डि.बी. दुचाकीने शहागड- पैठण राज्य महामार्गावर प्रवास करीत असतांना शहागड जवळील चाॅंदसुर्ये नाल्या वरील पुलांचे काम चालू असतांना गुत्तेदाराचे दुर्लक्ष आणि कामचालू असतांना रात्री लाईट न लावता तसेच मोठा फलक व दिशा दाखवणारी फलक लावलेले नव्हते.
यामुळे विकास मुरलीधर उगले वय 45 वर्ष या विवाहित तरुणाचा मृत्यू झाला तुझ्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार असून, घटनेची माहिती मिळताच जमादार फुलचंद हजारे, रामदास केंद्रे, यांनी घटनास्थळी धाव घेऊन, 108 रुग्णवाहिक येणे प्राथमिक केंद्र शहागड येथे आणलेले असताना, वैद्यकीय अधिकारी वैष्णवी नरवडे यांनी मयत घोषित करून , गुरुवारी दुपारी शवछेदन होऊन मृतदेह नातेवाई ताब्यात देण्यात आलेला आहे.
विकास उगले हे आपल्या मित्राला भेटण्यासाठी समर्थ कारखाना महाकाळा येथे पैठण शहा गड राज्य महामार्गावरून जात होते. मयताच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे.