Jalna Sugarcane Workers : १०२ ऊसतोड कामगार महिलांनी काढली गर्भपिशवी

मासिक पाळीत पोट दुखून मजुरी बुडू नये, यासाठी ऊसतोड कामगार महिलांनी आपली गर्भपिशवीच काढून घेतल्याची धक्कादायक माहिती
Jalna Sugarcane Workers
Jalna Sugarcane Workerspudhari photo
Published on: 
Updated on: 

जालना : मासिक पाळीत पोट दुखून मजुरी बुडू नये, यासाठी सुमारे ६९ ऊसतोड कामगार महिलांनी आपली गर्भपिशवीच काढून घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा प्रकार घनसावंगी आणि परतूर तालुक्यात ऊसतोड कामगारांच्या उपजिविका, आरोग्य आणि मुलांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या संस्थेने उघडकीस आणला आहे.

दरम्यान, आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोड कामगारांना इतरत्र जावून ऊसतोडीचे काम करावे लागते. जोडप्याने अगोदर मुकादम यांच्याकडून उचल घेतलेली असते. ती उचल फेडून गाठीला काही पैसे जोडावेत या आशेने जोडपे कोयता घेऊन ऊसतोडीसाठी तयार होतात.

Jalna Sugarcane Workers
Jalna News : ऊसतोड कामगार महिलांच्या आरोग्याची होतेय ‘परवड’ !

परंतु, ऊसाच्या फडाजवळ कोणतीही व्यवस्था नसते. मजुरी बुडू नये, घेतलेले कर्ज फेडण्यासाठी पतीला मदत व्हावी, यासाठी अनेक महिलांनी आपली गर्भपिशवी काढून टाकल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

Administrator
Jalna Sugarcane Workers
Sambhajinagar Land Acquisition Controversy : मनपाने परवानगीविना बदलला जागेचा वापर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news