Jafrabad wildlife water shortage : वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती

जंगलात पाणवठे तयार करा, प्रशासनाने लक्ष द्यावे
Jafrabad wildlife water shortage
डोणगाव ः वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे येत आहे. (छाया ः शेख फेरोज)
Published on
Updated on

डोणगाव ः जाफराबाद तालुक्यात वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून वन्य प्राण्यांची पाण्याकरिता जंगलामध्ये दूर दूर पाणी पिण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जंगलात पाणवठे तयार करून पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी पक्षप्रेमी यांच्याकडून होत आहे.

जाफराबाद येथील वन विभागाने जाफराबाद तालुक्यांमध्ये आत्तापर्यंत जंगलामध्ये कुठेही वन्यप्राण्यांकरिता पाण्याची ठिकाण उपलब्ध करून देण्यात आले नसल्याचे आरोप नागरिक व पक्षी प्रेमी यांच्याकडून करण्यात येत आहे. नदी, नाले, ओढे विहिरींची तळ गाठला गावासह शेतात उन्हाळ्यामुळे वन्य प्राणी पक्षी माकड इतर पाण्याच्या शोधासाठी फिरताना दिसत आहेत.

Jafrabad wildlife water shortage
लाखो रुपयांचा खर्च करूनही उन्हाळ्यात पाण्याचा ठणठणाट

विहिरींना तळ गाठला पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे शेतकरी आपल्या शेतात उन्हाळ्यामुळे शेतामध्ये आपल्या जनावराकरिता पाणी उपलब्ध करू शकत नसल्याचे दिसून येत आहे. जनावरे पक्षी प्राणी वर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ पाण्याची तीव्र टंचाई लक्षात घेऊन प्रशासनाच्या वतीने उपयोजना करण्याची गरजेचे आहे.

Jafrabad wildlife water shortage
Gangapur water crisis : गंगापूर तालुक्यातील तब्बल १८ गावे टंचाईग्रस्त

व्यवस्था करा - आतापर्यंत जंगलामध्ये कुठेही वन्यप्राण्यांच्या पाण्याकरिता सोय उपलब्धता नसल्याचे लक्षात आले आहे. फक्त शासन वन्यप्राण्यांची संख्या वाढवत आहे. उन्हाळ्यात पाण्याची सोय करत नसल्याचे दिसून येत आहेत. शासन लाखो रुपये खर्च असून पाण्यावर खर्च करत नसल्याचे दिसत आहे.

बाळू अंभोरे, पक्षीप्रेमी

वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून त्याकरिता वन विभागाने व शासनाने सहा महिने उन्हाळ्याच्या तीव्र टंचाई लक्षात घेऊनच वन्यप्राण्यांची व जनावरांची पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात यावी.

अतिक शेख, पक्षीप्रेमी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news