

It will be easier to get crop loans and insurance
आन्वा : पुढारी वृत्तसेवा
शेतकऱ्यांची आधारद्वारे ओळख पटविणार, जमीन मालकी सातबाराद्वारे निश्चित केली जाणार, या माहितीस शेतकऱ्यांचा आधार क्रमांक जोडून त्यास अद्वितीय' शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) मिळणार आहे.
कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) अनिवार्य करण्यात आला आहे. तसेच ई पंचनामा राज्यात सुरू करताना पंचनाम्यामध्ये शेतकरी फार्मर आयडी असणे बंधनकारक आहे. अग्रीस्टॅक ही केंद्र सरकारची योजना आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना फार्मर आयडी दिला जातो.
त्यामुळे त्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेता येतो. अॅग्रीस्टॅकमुळे शेतकऱ्यांची नोंदणी आणि ओळख करणे सोपे होईल. त्यामुळे त्यांना विविध योजनांचा लाभ मिळू शकणार आहे. शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांच्य लाभाकरिता फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. यामळे लाभ हस्तांतरण आणि केंद्र व राज्य सरकारच लाभ देण्याची प्रकिया सोपी होईल.
पीएम किसान सन्मान निधी, पीक विमा नैसर्गिक आपत्ती मदत, आदी अनुदाने थेट बँक खात्यात जमा होतील. अॅग्रीस्टॅकमुळे पीककर्ज आणि विमा मिळवण्याची प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक होणार आहे. यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.