

जालना ः इराण-अमेरिका युध्दामुळे जीवनावश्यक वस्तुंच्या किमतीत वाढ होत झाल्याने गृहिणींचे किचन बजेट कोलमडले आहे.गॅस पाठोपाठ तेलाचे भावही लिटरमागे 12 रुपयांनी तर साबुदाणाचे भावही किलोमागे 3 ते 5 रुपयांनी वाढले आहेत.
इराण -अमेरिका युध्दामुळे सूर्यफूल, सोयाबीन तेलाच्या दरात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. निर्यात केला जाणारा बासमती तांदूळ बंदरातून परत आला तरी गेल्या आठ दिवसांत त्याच्या दरात झालेली पाच रुपयांची वाढ कायम आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत 160 रुपये किलो असणारे सूर्यफुल तेल आता 173 रुपयांपर्यंत वाढले आहे.
प्रति लिटर तेलाचा दर आता 13 रुपयांनी वाढला. सूर्यफूल तेलाची मागणी आणि पुरवठ्यातील तफावत असल्याने सोयाबीन तेलाचे दरही वाढले आहेत. 140 रुपये लिटर मिळणारे सोयाबीन तेलाचा दर 155 रुपयांपर्यंत वाढले आहे. केवळ खाद्यतेल नाही तर साबुदाणा आणि बासमती तांदुळात सात रुपयांची वाढ झाली आहे. तांदूळ आणि बासमतीचा युद्धजन्य स्थितीशी संबंध नाही असे सांगण्यात येते.
सूर्यफूल तेल रशिया आणि युक्रेन युद्धामुळे वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून उपलब्ध होणारा साठा आणि मागणीच्या हिशेबात मोठे बदल दिसून येत आहेत. खाद्यतेलाच्या दरात गेल्या 20 दिवसांत मोठी वाढ दिसून आली आहे. खाद्यतेलाचा साठा पुरेसा असला तरी मागणी वाढल्याने दरामध्ये वाढ आहे. खरे तर इराण इस्रायल युद्धामुळे खाद्यतेलाच्या साठ्यावर कोणताही परिणाम झालेला नसताना दर का वाढविले जात आहेत, असा प्रश्न ग्राहक व्यापाऱ्यांना विचारत आहेत.
खाद्यतेलाबरोबर निर्यात केलेल्या जाणाऱ्या बासमती तांदळाचे दरही वाढविण्यात आले आहेत. अन्य जातीच्या तांदळाच्या किमतीमध्ये वाढ झालेली नाही. मात्र, बासमतीमध्ये ती वाढ दिसून येत असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेषत: सोयाबीन आणि मोहरीच्या तेलाची मागणी वाढल्याने त्याचे परिणाम अन्य तेलावर दिसू लागले आहेत. त्यामुळे तेलाचे भाव वाढले आहेत.
साबुदाण्याचा तुटवडा आणि युद्धजन्य स्थिती याचा काही संबंध नाही. तसेच तांदळाचेही आहे. उलट निर्यात न झालेल्या माल आता स्थानिक बाजारपेठेत येईल त्यामुळे तांदळाच्या भावात मंदी येईल. मात्र, काही दिवसांपूर्वी बासमतीचे भाव वाढलेले होते. खाद्यतेलाच्या दरातील लक्षणीय वाढ झाल्याने आता महागाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे.
आश्चर्य व्यक्त
तेल,गॅससह इतर जीवनाश्यक वस्तुंच्या किमतीत वाढ होत असल्याने गृहिणींचे किचनचे बजेट कोलमडले आहे.काही वस्तुंचा युध्दाशी संबध नसतानाही त्यांचा भाव वाढल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.