International Yoga Day : जालना शहरासह जिल्ह्यात योगदिन उत्साहात साजरा

सामूहिक योग प्रात्यक्षिकास योगप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
International Yoga Day
International Yoga Day : जालना शहरासह जिल्ह्यात योगदिन उत्साहात साजराfile photo
Published on
Updated on

International Yoga Day: Yoga Day celebrated with enthusiasm in Jalna city and the district

जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना शहरासह जिल्ह्यात रविवार (२१) रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध ठिकाणी आयोजित योग प्रात्यक्षीकांत मान्यवरांनी सहभाग नोंदवीला. जालना जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा प्रशासन, जिल्हास्तर योग समिती, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक), जिल्हा परिषद जालना, क्रीडा भारती, जिल्हा योग संघटना, सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा युवा अधिकारी, मेरा युवा भारत, विविध योग संस्था, जिल्हा स्काऊट अँड गाईड तसेच जिल्हा एकविध क्रीडा संघटना आणि विविध क्रीडा मंडळांच्या संयुक्त विद्यमाने रविवार (२१) रोजी येथील जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर सामूहिक योग शिबिर व योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते.

International Yoga Day
विविध योजनांतून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास : पालकमंत्री बोर्डीकर

या योग कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष दादासाहेब भुतेकर, डॉ. प्रकाश आंबेकर, क्रीडा प्रबोधिनीचे व्यवस्थापक सचिन पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, जिल्हा युवा अधिकारी मयुरकुमार गोरमे, जिल्हा सल्लागार आयुष विभाग डॉ. कुलदिप वाघपंजर, मिलिंद तायडे, सोनिया सिरसाठ, जिल्हा संघटक स्काऊट व गाईड, जालना, विजय गाडेकर, विनोद चोबे, क्रीडा संघटक, युवा बहुद्देशीय सेवाभावी संस्था व विविध कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून योग दिनाची सुरूवात करण्यात आली. योगगुरू मनोज लोणकर, रिषीता नाथानी, प्रणव किनगावर, सहाय्यक योग शिक्षक यांनी प्रत्यक्ष योगा प्रात्यक्षिकांना सुरूवात केली. यावेळी प्रमुख पाहुण्याच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन क्रीडा अधिकारी लता लोंढे यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक तसेच शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त सिध्दार्थ कदम यांनी केले.

International Yoga Day
P.V.Gadkari : समाजाला वाचा फोडण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केले

यावेळी शहरातील विविध अधिकारी कर्मचारी, विविध क्रीडा संघटनेचे पदाधिकारी, विद्यार्थी, पालक, शासकीय नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी, ऑक्सफर्ड हायस्कुल, संस्कार प्रबोधिनी विद्यालय, जालना व जि.प.निवासी क्रीडा प्रबोधिनी, जालना येथील स्काऊट व गाईड पथक मुले व मुली सह, खेलो इंडिया खो-खो प्रशिक्षण केंद्राचे खेळाडू, जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राचे खेळाडू, क्रीडा प्रेमी, क्रीडा संघटक, युवक युवती यांच्यासह मोठ्या संख्येने योगार्थी उपस्थित होते. या कार्याक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सिध्दार्थ कदम, राज्य क्रीडा मार्गदर्शक, लता लोंढे, क्रीडा अधिकारी आरती चिल्लारे संतोष प्रसाद, वरिष्ठ लिपीक अमोल मुसळे, कनिष्ठ लिपीक राहुल राठोड, राहुल गायके, जयपाल राठोड, हारूण खान, भानुदास लांडगे, विजय कांबळे, लताबाई लांडगे, सिंधु लांडगे आदिनी परिश्रम घेऊन यशस्वीपणे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यास सहकार्य केले.

या वेळी विविध विभागातील शासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थीनी, महिलासह सेवाभावी संघटांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. योग करणा-प्ऱ्यांमुळे संपुर्ण प्रांगण फुलुन गेले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news