Tembhurni Rain : टेंभुर्णी परिसरात रात्रभर रिपरिप; पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू

पावसामुळे खरिपाच्या पेरण्यांना वेग
Tembhurni Rain
Tembhurni Rain : टेंभुर्णी परिसरात रात्रभर रिपरिप; पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरूPudhari
Published on
Updated on

Intermittent rain throughout the night in the Tembhurni area; farmers busy preparing for sowing

टेंभुर्णी, पुढारी वृत्तसेवा : जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाफराबाद तालुक्याला वरुणराजाने अखेर दिलासा दिला. गेल्या दोन दिवसांपासून टेंभुर्णी परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगामातील पेरणीची लगबग सुरू झाली आहे. टेंभुर्णीत पेरणीच्या कामांना वेग आला आहे.

Tembhurni Rain
Farmers worried : पाऊस कधी येणार याचीच सर्वत्र चर्चा

टेंभुर्णीसह परिसरातील अनेक गावात पेरणी योग्य पाऊस झाला आहे. सलग दोन दिवस पाऊस झाल्याने शेतकरी यांनी कापूस, तूर लागवड केली. मूग, उडीद, सोयाबीन पेरणीचा लगबग सुरू आहे. मजूर मिळत नसल्याने कुटुंबातील सर्वच सदस्य शेती कामात मदत करताना दिसत आहे.

पावसाअगोदर "नदी-नाले कोरडे पडले होते. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला होता. या पावसाने शेतीला तर जीवदान मिळालेच, पण गावातील विहिरींची पाणी पातळीही वाढण्यास मदत होईल. यंदा विक्रमी उत्पन्नाची आशा आहे."

Tembhurni Rain
Hingoli Rain : पहिल्याच जोरदार पावसाने दाणादाण
यंदा मान्सून येण्यास उशिरा झाला, परंतु पेरणीच्या योग्य वेळी आल्याने वेळेवर पेरण्या पूर्ण होतील. कापूस आणि तूर लागवड करण्यात आली आहे. शेत तयार झाल्यावर मूग, उडीद पेरणी करण्यात येणार आहे.
- सुनिता अंभोरे, महिला शेतकरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news