

Increase in the price of edible oil
आन्वा, पुढारी वृत्तसेवा: अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले असून आता सोयाबीनच्या दरात झालेली वाढ ही खाद्यतेलावर २० टक्के इकतकी वाढत्या किमती यांचा एकत्रित परिणाम बाजारात दिसून येत आहे. बऱ्याच दिवसांपासून स्थिर अस-लेले खाद्यतेलाचे भाव अचानक वाढल्याने गृहिणींच्या स्वयंपाकघराचा अर्थसंकल्प बिघडला आहे.
सण-उत्सव नसतानाही झालेली ही दरवाढ सर्वसामान्यांच्या खिशाला चटका देणारी ठरत आहे, शेंगदाणा तेलाच्या दरात सर्वाधिक वाढ नोंदवली गेली आहे. शेंगदाणा तेल २०० रूपये किलोवर पोहोचले आहे. शेंगदाणा तेलासोबत बाजारात इतरही तेलाचे भाव वाढले आहेत.
वाढत्या महागाईसोबत आता सर्वसामान्यांना वाढलेल्या तेलाच्या भाताचीही झळ सोसावी लागत आहे. तेलाच्या दरात झालेल्या भाववाढीमूळे गृहिणीची स्वयंपाक घरातील हात आवरता घेतला आहे. त्यामुळे स्वयंपाक घरात तेलाच्या पदार्थवर सध्यातरी काही प्रमाणात बंदी घालण्यात आल्याचे दिसून येत आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर जवळपास स्थिर होते. मात्र, जानेवारीपासून अचानक दरवाढी सुरू झाला असून ही वाढ टप्प्याटप्याने होत आहे. खाद्यतेलाची अचानक दरवाढ झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.
अतिवृष्टीमुळे सोयाबीन व शेंगदाण्याचे उत्पादन घटले, सोयाबीनच्या हमीभावात वाढ, खाद्यतेलावर २० टक्के आयात शुल्क, डॉलर महागल्याने आयात बाज-ारातील वाढला, जागतिक अस्थिरता आदी कारणे दिसून येत आहेत. तेलाचे भाव अचानक वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका सहन करावा लागत आहे. गेल्या काही दिवसापासून तेलासह, शेंगदाने यासह इतर जीवनवाश्यक वस्तूचे भाव वाढत आहे.
किंमत वाढीचा व्यापाऱ्यांना फायदा
सणासुदीच्या काळात खाद्यतलाच्या दरात वाढत होते. मात्र यंदा कोणताही मोठा सणात वाढ झाली नाही. किरकोळ बाजारात दर आठवड्याला दरवाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळेच नागरिकांना याचा फटका बसत आहे.