jalna news
नेत्यांनी जागवल्या पवारांच्या आठवणीfile photo

jalna news : नेत्यांनी जागवल्या पवारांच्या आठवणी

घनसावंगी येथे श्रद्धांजली कार्यक्रम
Published on

A heartfelt tribute program, recalling memories of Ajitdada Pawar, was held at the Ghansawangi Nagar Panchayat

घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा :

लोकनेते कै. अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा देणारा भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रम घनसावंगी नगरपंचायत येथे पार पडला. या कार्यक्रमात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यापारी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या लाडक्या नेत्याला अश्रृंनी निरोप दिला.

jalna news
jalna news : पिकअपमधुन पाच गोवंश वासरे पकडली

कार्यक्रमाच्या प्रारंभी कै. अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर उपस्थितांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून आपल्या भावना व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी संपूर्ण परिसर शोकमय वातावरणाने भारावून गेला होता.

jalna news
जालना जिल्हा बालकामगारमुक्त करण्यासाठी कामाची गती वाढवा : जिल्हाधिकारी मित्तल यांचे निर्देश

वक्त्यांनी आपल्या भाषणांतून अजित पवार यांनी राज्याच्या विकासासाठी घेतलेले धाडसी निर्णय, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी केलेली संघर्षमय लढाई, युवकांना दिलेली दिशा आणि सर्वसामान्य जनतेसाठी केलेले अपार कार्य भावनिक शब्दांत मांडले. स्पष्ट भूमिका, निर्णयक्षम नेतृत्व आणि सामान्य माणसाशी थेट संवाद साधण्याची त्यांची शैली यामुळेच ते जनतेच्या मनात कायमचे घर करून गेले, अशी भावना व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news