Water Tanker : जालना जिल्ह्यात ४२ हजार नागरिकांची तहान २२ टँकरवर !

१२ गावे, ९ वाड्यांना टँकरचा आसरा; दररोज ४० फेऱ्यांद्वारे दिलासा
Water Tanker
Water Tanker : जालना जिल्ह्यात ४२ हजार नागरिकांची तहान २२ टँकरवर !file photo
Published on: 
Updated on: 

In Jalna district, the thirst of 42,000 citizens depends on 22 tankers

जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईचे सावट कायम असल्याचे चित्र समोर आले आहे. जिल्हा परिषदेच्या टंचाई अहवालानुसार, जिल्ह्यातील ४२ हजार ७४३ ग्रामस्थांची तहान भागवण्यासाठी २२ टँकर आणि २४ अधिग्रहित विहिरींचा आधार घ्यावा लागत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील १२ गावे आणि ९ वाड्या-वस्त्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

Water Tanker
Pitru Paksha : ग्रामीण भागातही कावळा झाला दुर्लभ; पंगती झाल्या कालबाह्य

ग्रामीण भागात टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून ३ शासकीय आणि १९ खाजगी अशा एकूण २२ टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. मंजूर असलेल्या ४२ फेऱ्यांपैकी दररोज प्रत्यक्षात ४० फेऱ्यांद्वारे गावोगावी पाणी पुरवले जात आहे. याशिवाय टँकर व्यतिरिक्त पाणीपुरवठा स्रोत बळकट करण्यासाठी २४ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

Water Tanker
Water Scarcity : ऑक्टोबरमध्येच तलाव कोरडे ! ६० पैकी ४२ लघु प्रकल्प तळाशी; ३ मध्यम प्रकल्प ज्योत्याखाली

बदनापूर तालुक्याला टंचाईचा सर्वाधिक फटका बसला आहे. तालुक्यातील ८ गावे आणि ५ वाड्यांमधील २४ हजार २८० लोकसंख्येसाठी तब्बल १४ टँकर (३ शासकीय, ११ खाजगी) कार्यरत आहेत. येथे दररोज २२ फेऱ्यांद्वारे पाणी वितरीत केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news