

Implement schemes effectively: District Collector
जालना, पुढारी वृत्तसेवा केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत विहित वेळेत प्रभावीपणे अंमलबजावणी करा, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले.
शनिवारी (दि.३०) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांच्यासाठी आयोजित प्रशिक्षणादरम्यान त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, उप जिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, उप विभागीय अधिकारी बी. सरवणन, पद्माकर गायकवाड, रामदास दौंड, उमाकांत पारधी, तहसीलदार यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी मित्तल म्हणाल्या की, केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांची अंमलबजावणी सुरळीत आणि वेगवान करण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी यांची महत्त्वाची व मोलाची भूमिका आहे. तसेच शासकीय कामकाजात गतिमानता आणण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) चा व ई ऑफिस प्रणालीचा उपयोग करावा. १७ सप्टेंबर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ या पंधरवाड्यात ग्रामीण भागातील पाणंद रस्तांचे प्रश्न, सर्वांसाठी घरे या योजनेचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यत पोहोचविणे, न्याय आपल्या दारी या जिल्ह्याच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत जिल्हातील नागरिकांचे जे काही प्रलंबित प्रश्न असतील तर ते प्राधान्यक्रमाने सोडविण्यात येणार आहेत.
सकाळी १० ते ११ या कालावधीत सर्वांसाठी घरे योजनेबाबत, जिवंत ७/१२ मोहीम, भोगवटादार वर्ग ०२ मधून भोगवटादार वर्ग ०१ रुपांतरणाबाबत, शर्तभंग प्रकरणाबाबत उप जिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, याांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
सकाळी ११ ते ११:४५ या कालावधीत अनुदान वाटप पध्दती, महसुली नकाशामध्ये दर्शविलेल्या सर्व पाणंद व शिवरस्त्यांचे चरर्राळिपस करून व रस्त्याच्या दुर्तफा वृक्ष लागवड करणे, ई-फेरफार, ई-चावडी इत्यादी. या विषयावर उप विभागीय अधिकारी परतूर पद्माकर गायकवाड, यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
दुपारी १२ ते १ या कालावधीत महाराजस्व अभियान राबविणे, ग्रिस्टॅक, (-gristack) (Digital Public Infrastructure for-griculture) योजना अंमलबजावणी, कमी जास्त पत्रक, तुकडे बंदी कायदा, विशेष अर्थसहाय्य योजनेतंर्गत DBT साठी पात्र लाभार्थ्यांची योजनेनिहाय माहिती संकलित करणे याविषयी उप विभागीय अधिकारी अंबड उमाकांत पारधी, तहसीलदार अंबड विजय चव्हाण याांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कालावधीत वाळू/रेती निर्गती धोरण २०२५, वाळूघाटांचे सर्वेक्षण आर्दीचे प्रशिक्षण दुपारी देण्यात आले.
प्रत्येकाला आयुष्यात मनुष्य जन्म एकदाच मिळतो त्यामुळे आपण कार्यालय व घरी सर्वोत्तम काम करण्याचा प्रयत्न करा सोबतच प्रत्येकाने शारीरिक ऊर्जा वाढविण्यासाठी व मानसिक ताण-तणाव कमी करण्यासाठी जीवनात छंद जोपासणे आवश्यक आहे. तसेच आयुष्यात कायम शिकण्याची भूमिका जोपासा असा मोलाचा सल्ला जिल्हाधिकारी मित्तल त्यांनी दिला.