Jalna Rain Alert : पावसाची शक्यता, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

कधी ऑरेंज तर कधी यलो अलर्ट, नागरिक धास्तावले
Jalna Rain Alert
Jalna Rain Alert : पावसाची शक्यता, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशाराFile Photo
Published on
Updated on

Chance of rain, citizens warned to be alert

जालना, पुढारी वृत्तसेवाः मुंबई येथील कुलाबा प्रादेशिक हवामान केंद्राच्यावतीने दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्ह्यात २९ रोजी ऑरेंज तर ३० ऑगस्ट रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र हवामान विभागाच्या अलर्टनंतर जिल्ह्यात कोठेही मोठा पाऊस पडला नाही. त्यानंतर आता पुन्हा ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Jalna Rain Alert
Ganesh Chaturthi : गौराईचे आज होणार आगमन

जालना जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. काही भागात अतिवृष्टीमुळे ओढे, तलाव, विहिरी व नद्या तुडुंब भरल्या आहेत. तर काही भागात समाधानकारक पाऊस पडला आहे. सततच्या पावसामुळे खरीप पिकांवर मोठा परिणाम झाला आहे.

जिल्ह्यात वीज पडून ३९ जनावरे दगावली आहेत. खरीप पिकांचे पंचनामे सुरू असतानाच कधी ऑरेंज तर कधी यलो अलर्टचा इशारा जारी करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये पावसाची दहशत कायम आहे.

Jalna Rain Alert
Jalna News : चोरून नेलेले लोखंडी अँगल जप्त

संपर्क करा

नागरिकांनी वादळी वारे, विजेपासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण करावे. आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना ०२४८२-२२३१३२ वर तसेच नजीकचे तहसील कार्यालय, पोलिस स्टेशन यांचेशी संपर्क साधाण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गणेश महाडिक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news