Jalna News : थकबाकीच्या तारखांमुळे टेंभुर्णीतील शेकडो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित

मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन; वंचिताना लाभ देण्याची मागणी
Jalna News
Jalna News : थकबाकीच्या तारखांमुळे टेंभुर्णीतील शेकडो शेतकरी कर्जमाफीपासून वंचितfile photo
Published on: 
Updated on: 

Hundreds of farmers in Tembhurni deprived of loan waiver due to arrears

टेंभुर्णी, पुढारी वृत्तसेवा : शासनाच्या वतीने 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' अंतर्गत कर्जमाफीसाठी निश्चित केलेल्या थकबाकीच्या तारखांमुळे अनेक पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहिले आहेत. वंचित राहिलेल्या शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Jalna News
Jalna News : वनीकरण विभागात जुगार अड्ड्यावर पोलिसांची मध्यरात्री धाड

या योजनेनुसार १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घेतलेले पीक कर्जच पात्र धरले गेले आहे. तसेच हे कर्ज ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत असणे आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत त्याची परतफेड न झालेली असणे अनिवार्य आहे. ज्या शेतकऱ्यांनी १ एप्रिल २०२५ नंतर खरीप हंगामासाठी कर्ज घेतले किंवा ज्यांचे कर्ज ३० सप्टेंबर २०२५ नंतर थकीत झाले, ते या अटीमुळे योजनेतून बाहेर पडले आहेत.

राष्ट्रीयकृत बँकेमार्फत घेतलेल्या पीककर्ज सन २०१७ व २०१८ या वर्षातील जुलै मधील शेतकऱ्यांना दोन्ही कर्ज माफी योजनेचा लाभ घेता आला नाही. तर प्रोत्साहन दिलं नाही. दोन्ही योजनेचा तारखेच्या घोळात वंचित राहिलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

अशी मागणी शेतकरी भाऊराव आटपळे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या तक्रारी मध्येनमूद करण्यात आले आहे. त्यांनी तक्रारीत म्हटले की, महाराष्ट्र बँक व बडोदा बँकेने थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या सर्व पाठविल्या होत्या. तरीही पती-पत्नी जॉईंट खातेदार शेतकरी आणि जुलै महिन्यातील शेतकरी वगळले गेले. याची पुन्हा चौकशी करावी. वंचित राहिलेल्या शेतकरी यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री यांच्यासह संबंधित विभागाला पाठविण्यात आले.

Jalna News
Jalna News : शॉर्ट सर्किट झाल्यामुळे साडेचार एकर ऊस जळून खाक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.