Bhokardan Crime : लोणगाव शिवारात जुगार अड्ड्यावर छापा; पाच जणांविरुद्ध गुन्हा

३ लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त
Bhokardan Crime
भोकरदन : तालुक्यातील लोणगाव शिवारातील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारल्यानंतर ताब्यात घेण्यात आलेल्यांसह पोलिस अधिकारी व कर्मचारी .pudhari photo
Published on
Updated on

भोकरदन : तालुक्यातील हसनाबाद पोलिसांनी लोणगाव शिवारातील जुगार अड्ड्यावर छापा टाकून पाच जणांवर कारवाई करीत त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल फोन, दुचाकी व जुगार साहित्य असा ३ लाख १७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

लोणगाव गावाजवळील एका मोकळ्या जागेत काही जण जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत नारायण रमेश बारवकर, पांडुरंग बबन राऊत, बाबासाहेब बाळाजी बारवकर , राहुल साहेबराव घिने आणि नारायण कुंडलिक साखरे (सर्व रा. लोणगाव, ता. भोकरदन) यांना ताब्यात घेण्यात आले.

Bhokardan Crime
Satara crime: वाठार पोलिसांची जुगार अड्ड्यावर कारवाई; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम, विविध कंपन्यांचे मोबाईल फोन, मोटारसायकली तसेच जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल अविनाश मांटे यांच्या फिर्यादीवरून हसनाबाद पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा २२ जून रोजी नोंदविण्यात आला.

यांनी केली कारवाई

ही कारवाई पोलिस अधीक्षक तेजबीर सिंग संधू, अपर पोलिस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि योगेश जावळे, मपोउपनि अर्चना भोसले, पोलिस कॉन्स्टेबल अविनाश मांटे, हरीभाऊ शिरसागर आणि मेवा नागलोत यांच्या पथकाने केली.

Bhokardan Crime
Belgaum Crime: जुगार अड्ड्यांवर छापे; २६ जणांना अटक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news