

'Har Ghar Tiranga' campaign in the district
जालना, पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारच्या सुचनेप्रमाणे जिल्ह्यात देशभक्तीचे वातावरण निर्माण व्हावे, तिरंगामय वातावरण व्हावे, या उद्देशाने १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत 'हर घर तिरंगा' अभियान राबविण्यात येत आहे. सर्व संबंधित विभागाने समन्वय साधून हे अभियान यशस्वी करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. त्यानुसार जिल्ह्यात तर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे.
डोणगावात विद्यार्थ्यांची रॅली डोणगाव : जाफराबाद तालुक्यातील डोणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने हर घर तिरंगा अभियानातर्गत गाजात रॅली काढण्यात आली. स्वयंसेवकांद्वारे हर बर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. गावात विद्याथ्यांनी बोलच्या आवाजात जनजागृती रॅली कातून नागरिकांचे मन जिंकले हर घर तिरंगा रैलीची सुरुवात जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू व मराठी शाळेमध्ये प्रांगणातून सुरुवात करण्यात आली मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक कलीमुद्दीन बुकने, राजेंद्र पाचरणे, जयदीप विस्ने, नजमुद्दीन शेख, मोहिम शेख, आफ्रीन सिद्दिकी दिलीप कुलकर्णी, यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका पालक उपस्थित होते. जनता विद्यालयात ध्वजवंदन पारध भोकरदन तालुक्यातील पारध येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान सुरू असलेल्या हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत ज्येष्ठ शिक्षक रवी लोखंडे यांच्या उपस्थित्तीत ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी प्राचार्या शर्मिला शिंदे, पर्यवेक्षक महेंद्र लोखंडे, विजया कदम, मुदला काळे, लता वानखेडे, प्रा.संग्रामराजे देशमुख यांच्यासह शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
डोणगाव जि.प. शाळेत ध्वजवंदन डोणगांव जाफराबाद तालुक्यातील डोणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू व मराठी शाळेमध्ये शासनाच्या परिपत्रकानुसार ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कलीम शेख यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक कलीम युकने, राजेंद्र पाचरणे, जयदीप विघ्ने, नजमुद्दीन शेख, मोत्तिव शेख, आफ्रीन सिद्दिकी, अन्सार कुरेशी, प्रकाश घोडके, ज्ञानेश्वर सुरसे, सलीम शेख आदींची उपस्थिती होती.
डोणगांव बदनापूर तालुक्यातील बावणे पांगरी येथे ऋषी महाराज आदर्श व कनिष्ठ महाविद्यालय आणि 'आझादी का अमृत महोत्सव 'या उपक्रमा अंतर्गत ध्वज रोिहण करण्यात आले. यावेळी अध्यक्ष म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव बोहरखे होते. प्रमुख पाहणे म्हणून उपसरपंच बबन ठुबे, सरपंच, उपसरपंच, आजी-माजी ग्रामपंचायतचे पदाधिकारी, प्रतिष्ठीत पालक उपस्थित होते. ध्वजपूजन सुभाषराव बोडखे यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन वर्ग ८ वी ची विद्यार्थिनी अनुजा चव्हाण हिने केले तर आभार प्रदीप पाटोळे यांनी केले. प्राचार्य कृष्ण जाधव, उपप्राचार्य संदीप सोनुने सर्व शिक्षक शिक्षिका पालक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.
जाफराबाद येथील सिद्धार्थ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांद्वारे हर घर तिरंगा रॅली काढण्यात आली, हर घर तिरंगा रॅलीची सुरुवात सिद्धार्थ महाविद्यालयातील प्रांगणातून करून शहरातील विविध भागातून काढण्यात आली. रॅलीद्वारे शहरवासीयांना हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. रमेश देशमुख, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. शिवाजी जगतवाड, प्रा. प्रदीप मिसाळ, सिद्धार्थ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुनील मेडे, उदय चझरकर, प्रा. शिवाजी वैद्य, वाहेद पटेल यांची उपस्थिती होती.