

Police raided the hotel, detained women who had come for prostitution
बदनापूर, पुढारी वृत्तसेवा : जालना-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील कडेगावफाट्यावरील शिवराज हॉटेलवर छापा टाकून बदनापूर पोलिसांनी देह विक्री करण्यासाठी आलेल्या तीन महिला व चार पुरुषांना ताब्यात घेतले.
बदनापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांनी तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंद्याविरोधात मोहीम हाती घेतली आहे. बुधवारी (ता. १३) संध्याकाळी जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील कडेगाव फाटा या ठिकाणी शिवराज हॉटेल मध्ये देह विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांना मिळाली.
त्यांनी तत्काळ सहकाऱ्यांसह या हॉटेलमध्ये छापा टाकला असता, त्या ठिकाणी देह विक्रीच्या व्यवसायासाठी आण-लेल्या ३ महिला आणि व चार ग्राहक पुरुषांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) कायद्यांतर्गत बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांच्या सह सहायक पोलिस निरीक्षक स्नेहा करेवाड, पोलिस उपनिरीक्षक संतोष कुकलारे, रंजीत मोरे, प्रताप जोनवाल, पोलिस जमादार गोविंद डोभाळ, शबाना तडवी यांनी केली.
बदनापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही वर्षांपासून अवैध व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. एकीकडे बदनापूर शहराची ओळख ही शैक्षणिक हब म्हणून होत असताना शहरात सुरू असलेल्या अवैध व्यवसायामुळे शहराची प्रतिमा मलिन होत आहे.