

मंठा ः अवैधरीत्या गुटखा घेऊन जाणारी कार मंठा पोलिसांनी तळणी फाटा येथे पकडली. पोलिसांनी कारसह 49,314 रुपयांचा गुटखा असा एकूण 3 लाख 49 हजार 314 रुपयांचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी रवी जाधव यांच्या फिर्यादीवरून संशयित योगेश महादेव अवचार, आकाश अग्रवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
वाटूर फाट्याकडून मंठ्याकडे एक इसम अवैधरीत्या गुटखा घेऊन मंठ्याकडे येत असल्याची माहिती मंठा पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी तळणी फाटा येथे सापळा लावून वाटूर फाट्याकडून मंठ्याकडे येणाऱ्या कारला थांबवले.
कारची पाहणी केली असता, त्यात 49,314 रुपयांचा गुटखा दिसून आला. कारचालक योगेश महादेव अवचार (26 रा. विडोळी, ता. मंठा) याला ताब्यात घेतले. त्याने सदरील गुटखा हा आकाश अग्रवाल (रा. वाटूर, ता. परतूर) याच्याकडून आणल्याचे सांगितले. याप्रकरणी दोघांवर मंठा ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.